![]()
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या (करामसाप) बेंगलोर विभागाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत मुळचे नांदेड येथील प्रसिद्ध पचनसंस्था विकारतज्ञ डॅा. अनुराग लव्हेकर यांची उपाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली आहे. डॅा. अनुराग लव्हेकर यांचे ‘वसुंधरेचे शोधयात्री’ हे पुस्तक अल्पावधीत लोकप्रिय झाले असून साहित्यिक वर्तुळात या पुस्तकाची चर्चा आहे. आस्वादक समीक्षेचे पुस्तकांवरील पुस्तक असणारे त्यांच्या ‘पुस्तके : साद आणि दाद’ या ग्रंथास नुकताच मराठवाडा साहित्य परिषदेचा मानाचा नरहर कुरुंदकर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय परिषदेत आमंत्रित वक्ते म्हणून डॅा. लव्हेकरांना स्थान देण्यात आले होते. विविध दिवाळी अंकांमधून त्यांच्या लेखनास प्रसिद्धी मिळाली आहे. डॅा. लव्हेकर सध्या बेंगलोर येथील मणिपाल हॅास्पिटल गॅस्ट्रोएंटेरॅालॅाजी विभागात कार्यरत असून निनाद फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कलबुर्गी येथील गुरय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील राज्य समितीने बेंगलोर विभागीय कार्यकारिणी जाहीर केली. करामसाप बेंगलोर विभाग कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – व्यंकटेश देवनपल्ली (अध्यक्ष), डॅा. अनुराग लव्हेकर (उपाध्यक्ष), राकेश शेटे (कार्यवाह), तुषार भट (कोषाध्यक्ष), दीपाली वझे (सदस्य), मानसी होळेहोन्नूर (सदस्य), प्रतिभा टेकाडे (सदस्य), डॅा. नम्रता कुलकर्णी (सदस्य)
Source link
डॉ. अनुराग लव्हेकर यांची 'करामसाप'च्या उपाध्यक्षपडी फेरनिवड:वैद्यकीय सेवेसोबतच साहित्य क्षेत्रातही उमटवला ठसा