![]()
अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार डॉ. महेंद्र मेटे यांनी स्वीकारला आहे. यापूर्वीचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांची अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. महाविद्यालयात डॉ. कुलट यांना निरोप देण्यासाठी आणि डॉ. मेटे यांचे स्वागत करण्यासाठी दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यगौरव व सत्कार सोहळ्याला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रमेश अंधारे, वाणिज्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. बी. टी. गावंडे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक प्रा. कविता पाटील आणि अधीक्षक किशोर राजगडे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांनी डॉ. अंबादास कुलट यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाध्यक्ष डॉ. महेंद्र मेटे यांनी डॉ. कुलट यांचा ‘ॲकॅडेमिक व्हिजनरी’ म्हणून उल्लेख केला. डॉ. कुलट यांनी या महाविद्यालयातील २२ महिन्यांचा कार्यकाळ सदैव स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारात डॉ. बी. टी. गावंडे, डॉ. रवी जुमळे, डॉ. प्रकाश तायडे, भैय्यासाहेब मेटकर आणि प्राचार्य डॉ. अर्चना बोबडे यांनी सहभाग घेतला. तसेच, माजी प्राचार्य डॉ. रमेश अंधारे यांनी प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. जयराम गायकवाड यांनी केले, तर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर साबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उमेश कडू, डॉ. संजय कटाईत, डॉ. ज्ञानेश्वर नामुर्ते, डॉ. सुवर्णा गाडगे आणि राजू अंबाडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. प्रशांत हरमकर यांनी आभार मानले. या सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Source link
डॉ. महेंद्र मेटे शिवाजी महाविद्यालयाचे नवे प्राचार्य:डॉ. अंबादास कुलट यांची अकोला येथे बदली झाल्याने पद झाले होते रिक्त