Headlines

डोंगरगाव येथे आयोजित मृद आरोग्य कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद:शेतातील मातीचे परीक्षण करून घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन‎




सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता निर्देशांक या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर तालुका स्तरीय कार्यशाळा डोंगरगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत मंडळ कृषी अधिकारी परीक्षित पाटील यांनी शेतकऱ्यांना सखोल व प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी माती व पाण्याचे नमुने वैज्ञानिक पद्धतीने कसे घ्यावेत, नमुना घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह प्रात्यक्षिक दाखवले. अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या नमुन्यांमुळे अहवाल अचूक येत नाही आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. तसेच त्यांनी मृदा आरोग्य पत्रिका समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करत, त्यातील घटक जसे की पीएच, सेंद्रिय कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादींचा अर्थ सोप्या भाषेत स्पष्ट केला. त्या अहवालाच्या आधारे योग्य खत व्यवस्थापन केल्यास खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते, असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत माती नमुना संकलनाची अचूक पद्धत, मृद चाचणीचे दीर्घकालीन फायदे, तसेच सुपीकता निर्देशांकांच्या आधारे पीकनिहाय नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनीही विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी प्रमोद दाबके (भराडी), उपकृषी अधिकारी प्रवीण वाघ, नंदू जाटोटे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी मीनाक्षी ठाकरे, तडवी मॅडम, वृषाली मुळे, योगिता मनसोटे, श्रुती खंदारे, निकिता दाभाडे, भोलेनाथ सूर्यवंशी, विलास वाघ, जनार्दन वानखेडे आणि आत्मा विभागाचे महालिंग कुंभार आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *