Headlines

शिरेगाव जि. प. शाळेस 15 हजारांची पुस्तके भेट‎:प्रा. कुकलारे यांचा पुढाकार, शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होणार मदत




लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बँक उभारण्यात आली आहे. यासाठी शिरेगावचे भूमिपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. प्रा. नंदकुमार कुकलारे यांनी बुक बँकसाठी १५,००० रुपयांच्या पुस्तकांची मोफत भेट दिली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके शाळेतच वाचण्यास मिळणार आहेत. या पुस्तकांचा स्विकार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग गोटे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड व पदवीधर जेष्ठ शिक्षक अंकुश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. कुकलारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेली पुस्तके कष्टकरी, शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या पुस्तकांचा उपयोग विद्यार्थी,पालक व गावकरी यांनीही करावा, असे आवाहन केले. शाळेतर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते प्रगतिपत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी निलेश कहाटे, प्रज्ञा निरवणे, सुनीता राठोड, संगीता भालेराव, स्नेहा खंदारे, गीतांजली बेदरे यांनी मोलाचे सहकार्य केले. . तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने हाणे यांनी संविधानाच्या दोन प्रती शाळेला भेट दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शहाणे, सेवानिवृत्त पीएसआय नारायण गोटे, दिगंबर गोटे, अंबादास गोटे, सुरेश गोटे, अनिल कऱ्हाळे, गौतम गायकवाड, शिवाजी शिंदे तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरेगाव जिल्हा परिषद शाळेला १५ हजारांची पुस्तके भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बँकेचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी प्रा. कुकलारे यांनी १५ हजारांची पुस्तके भेट देण्यात आली आहेत. दरम्यान, या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होेण्यास मदत होणार आहे. ही पुस्तके स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याने या उपक्रमाचे कौतूक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *