![]()
स्वरांची धुँवाधार बरसात… वाद्यांची समृद्ध साथ…सुश्राव्य निवेदन…त्यावर आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या लोकप्रिय गाण्यांनी भारावलेल्या अमरावतीकर रसिकांच्या टाळ्या.. वाहवा आणि वन्स मोअर असा नेत्रदीपक स्वरसोहळा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाने शनिवारी रात्री अनुभवला. निमित्त होते, बहुविध गायिका आशा भोसले आणि ‘प्रतिलता’ असा उल्लेख केला जाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांनी सजलेल्या “आशा- सुमनांजली’ या कार्यक्रमाचे. संस्कार भारतीची महानगर शाखा आणि अमरावती महानगर पालिकेच्या सहकार्याने या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साध यती संस्कार भारती भारते नव जीवनम्…’ या संस्कार भारतीच्या ध्येय गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रा. डॉ. जयश्री वैष्णव, आशुतोष देशपांडे, प्रा. डॉ. सोनाली शिलेदार, शीतल भट, केतकी मोहदरकर- देशपांडे, शुभम पांडे, आदित्य खारोकर, कोमल ढोके, श्रावणी भडके आणि ऋचा ठाकरे- बडनखे यांनी सुरेल सफर घडवली. कार्यक्रमाची सुरवात महापालिकेचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले, सभागृह नेते चेतन गावंडे आणि स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. सभागृहाच्या कॅफेट एरियात संध्या देवळे, स्वप्नील जोशी, विदुला जोशी, शीतल पटेरिया, शर्वरी धनोकर, अपूर्वा उमप यांनी साकारलेली आशाबाई आणि सुमनताई यांची रांगोळी लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाला विवेक कवठेकर, अमरावती महानगरचे अध्यक्ष दीपक जोशी, मुरलीधर भोंडे, डॉ. कमलताई भोंडे, प्राचार्या डॉ. मीनल ठाकरे, डॉ. अलकनंदा तुळजापुरकर, गजलगायक सुरेश दंडे यांच्यासह अमरावती शहरातील मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या देखणेपणात भर सचिन गुढे, तबल्यावर ॲड. मिलिंद वैष्णव आणि शीतल मांडवगडे, ऑक्टोपॅडवर राजदीप चावरे, गिटारवर दिनेश कांबळे, ढोलक आणि कोंगोवर योगेश गजभिये, बासरीवर अरविंद उपाध्ये तर व्हायोलिनवर हरीश लांडगे यांनी दमदार संगत केली. रफिकभाई यांच्या उत्कृष्ट ध्वनीव्यवस्था देखणेपणात भर घातली. डिजिटल स्क्रीनवर दाखवून ॲड. श्रेयस वैष्णव यांनी रसिकांच्या डोळ्यांपुढे गतकाळाच्या स्मृती जाग्या केल्या.
Source link
तरुण आहे रात्र अजुनी…चंद्र आहे साक्षीला:शनिवारी रात्री रंगली संस्कार भारतीच्या आशा ‘सुमनांजली''ची सुरेल सफर