Headlines

ताशे चोरीप्रकरणी आरोपीला अटक:अमरावतीत ४८ हजार रुपये किमतीचे ८ ताशे जप्त




अमरावती शहर कोतवाली पोलिसांनी ४८ हजार रुपये किमतीचे आठ ताशे चोरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अंबापेठ येथील मनिबाई गुजराती शाळेजवळ राहणारे प्रसाद राजेंद्र जगताप (वय २६) यांनी २३ जून रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये ठेवलेल्या नऊ ताशांपैकी आठ ताशे २२ जून रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संकेत अंगेश घोसले (वय १९, रा. राजुरा पारधी बेडा, अमरावती) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले आठही ताशे, म्हणजेच एकूण ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगला वाकडे आणि तपास पथकाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *