![]()
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चूयेकर यांच्या करवीर तालुक्यातील चूये गावातील स्मारकाला अभिवादन करून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. सतेज पाटील यांनी महायुतीवर जोरदार घणाघात केला आहे. तिन्ही पक्ष सहा महिने भांडले, दूध संस्थांना वेठीस धरले आणि आता गळ्यात गळे घातले, असा टोला सतेज पाटील यांनी महायुतीला लगावला. त्यामुळे शिट्टी विजयी करा आणि महायुतीचा सहा महिन्यांचा तमाशा संपवा, असे आवाहनही त्यांनी केले. इतकेच नाही, तर महायुतीचे नेते ठरावधारकांकडून शपथा घेत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मग तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही का? असा सवालही सतेज पाटील यांनी केला. गोकुळ टिकवण्यासाठी आमची लढाई महायुतीच्या नेत्यांची नुरा कुस्ती आहे, सहा महिने झालं नुसतीच खडखडी सुरु आहे. आमची लढाई साडेपाच लाख लोकांच्या संसारासाठी, गोकुळ टिकवण्यासाठी असल्याचे पाटील म्हणाले. जिल्हाचे अर्थकारण जीवंत ठेवण्यासाठी गोकुळ जिवंत ठेवा. विकासाची शिट्टी वाजवण्यासाठीच आम्हाला शिट्टी चिन्ह मिळाल्याचे पाटील म्हणाले. महायुतीचे उमेदवार सिंगल वोटिंग मागणार नाहीत, यासाठी शपथ घेतात, आमचे उमेदवार दूध उत्पादकांची सेवा करण्याची शपथ घेणार असल्याचे पाटील म्हणाले. सरदार पटेल डेअरी फेडरेशनमध्ये घेऊन गोकुळला संपवणे महायुतीचा मोठा अजेंडा असल्याचे पाटील म्हणाले. चुयेकर साहेबांना पत्रकावर ठेवणार? चुयेकर साहेब कायमपणे आमच्या हृदयात आहेत. पण महायुती त्यांना फक्त पत्रकावर ठेवणार, तेही फक्त 18 तारखेपर्यंतच अशी टीका देखील पाटील यांनी केली. आम्ही चुयेकर साहेबांच्या समाधीला अभिवादन करुन प्रचार शुभारंभ केला, महायुतीने काय केले? असा सवाल सतेज पाटलांनी उपस्थित केला. गोकुळ निवडणुकीसाठी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ आज करण्यात आला. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चूयेकर यांच्या करवीर तालुक्यातील चूये येथील स्मारकाला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह समविचारी आघाडीचे नेते उपस्थित होते.
Source link
'तिन्ही पक्ष सहा महिने भांडले आणि आता गळ्यात गळे घातले':सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल; शिट्टीला विजयी करण्याचे आवाहन