![]()
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात असलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिबेटमधील सागा येथे अडकलेले हे सर्व भाविक आता सुखरूप काठमांडूकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केलेल्या पुढाकारामुळे आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्यामुळे या भाविकांचा परतीचा मार्ग मोकळा झाला. सागा येथे अडकले होते भाविक ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासादरम्यान ते तिबेटमधील सागा या ठिकाणी अनपेक्षितपणे अडकून पडले. या सर्व भाविकांचे काठमांडूहून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित आहे. विमान चुकल्यास पुढील प्रवास अधिक खडतर झाला असता, त्यामुळे त्यांना वेळेत काठमांडू गाठणे अत्यंत आवश्यक होते. मुख्यमंत्र्यांचा तातडीचा पुढाकार महाराष्ट्रातील भाविक सागा येथे अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित सूत्रे हलवली. त्यांनी तातडीने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी (MEA) संपर्क साधून आवश्यक ते सहकार्य मिळवले. दोन्ही सरकारांच्या समन्वयातून प्रशासकीय पातळीवर जलद गतीने हालचाली झाल्या. परिणामी, आज सकाळी ६ वाजता सर्व भाविकांनी सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूच्या दिशेने आपला सुरक्षित परतीचा प्रवास सुरू केला. भाविकांकडून सरकारचे आभार परदेशात अनपेक्षितपणे अडकल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, ऐन संकटप्रसंगी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळाल्याबद्दल या सर्व भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. परतीचा प्रवास वेळेत सुरू झाल्याने भाविकांच्या नातेवाईकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. परतीच्या प्रवासावर निघालेल्या भाविकांची यादी.. हेही वाचा.. तिबेटमध्ये तलाव फुटला, नेपाळने मदतकार्य रोखले:लष्कराचे जनतेला सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन; आतापर्यंत 478 ठार, 1000 बेपत्ता नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात तिबेट सीमेवरील सरोवराचा बांध तुटला आहे. यामुळे खालच्या भागातील नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. सध्या बचावकार्य ९० मिनिटांसाठी थांबवण्यात आले आहे. नेपाळी अधिकाऱ्यांनी लोकांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. दरम्यान, चीनने शुक्रवारी तिबेटमध्ये मदत आणि बचावकार्य थांबवले असून लेव्हल-4 अलर्ट जारी केला आहे. अधिकाऱ्यांनी या भागात वारंवार पुराचा धोका वाढल्याचे कारण सांगितले आहे. बुधवारी झालेल्या भीषण भूस्खलनानंतरही येथे शेकडो लोक बेपत्ता आहेत. सविस्तर वाचा
Source link
तिबेटमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविक सुखरूप:सागा येथून काठमांडूकडे परतीचा प्रवास सुरू; प्रशासकीय पातळीवरील वेगवान हालचालींमुळे यात्रेकरूंना दिलासा