![]()
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अवघ्या तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. पण तत्पूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सर
.
गेल्या पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामासाठी सुरू असलेल्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक भागांतील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी सुरू केली असून, मान्सून वेळेत दाखल झाल्यास खरीप हंगामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर, कर्जत, पाथर्डी, नेवासे, श्रीरामपूर, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र पारनेर, राहुरी, अकोले, कोपरगाव आणि राहाता या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील शेतकरी अजूनही जोरदार सरींची प्रतीक्षा करत आहेत.
४ जूनअखेर जिल्ह्यात ८.६ मिमी मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ०.६ मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा आतापर्यंत तब्बल ८ मिमी अधिक पाऊस झाला आहे. अहिल्यानगर तालुक्यात २१.४ मिमी, कर्जतमध्ये २०.२ मिमी तर पाथर्डीत १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.