Headlines

साल्हेर किल्ला परिसरात 100 वृक्षांचे रोपण:पोलिस व वन विभागाचा उपक्रम, 500 किलो कचऱ्याचे संकलन‎




जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साल्हेर येथे वन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत विविध प्रकारच्या १०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सुमारे ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच ऐतिहासिक वारसा जतनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमास मालेगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक दर्शन दुग्गड तसेच जयखेडा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ताहराबादचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शरमाळे, वनपाल पी. एस. पवार, वनरक्षक दत्तू गुंजाळ तसेच वन व पोलिस विभागाचे अधिकारी-कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरदार काकडे यांच्या समाधीस्थळी वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर साल्हेर किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतनाबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला. साल्हेर किल्ल्याचे नैसर्गिक व ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमास वन विभाग व पोलिस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन व ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. साल्हेर किल्ल्याचे नैसर्गिक व ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. – ज्ञानेश्वर शरमाळे, वनपरीक्षेत्र अधिकारी, ताहराबाद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *