Headlines

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत 6.45 कोटी रुपये




श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार, १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना साईबाबांना वस्त्र अर्पण करण्याची, तसेच साईबाबांनी परिधान केलेले वस्त्र प्रसादरूपाने प्राप्त करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय देणगीच्या रकमेनुसार भाविकांना व्हीआयपी व व्हीव्हीआयपी आरती दर्शनाची सुविधाही दिली जात आहे. सोशल मीडियावरील प्रभावी प्रचार आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे शिर्डीकडे भाविकांचा ओढा कमालीचा वाढला आहे. परिणामी रोख देणगी, ऑनलाइन देणगी, सोने-चांदी यासोबतच वस्तूरूप देणग्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. तीन वर्षांत साईबाबांना १९ हजारांहून अधिक शाली अर्पण करण्यात आल्या आहेत. लिलाव, प्रसाद विक्रीतून कोट्यवधींचे उत्पन्न साईबाबांनी परिधान केलेली ही वस्त्रे नंतर लिलावाद्वारे किंवा प्रसादरूप विक्रीच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून दिली जातात. या संपूर्ण प्रक्रियेतून संस्थानला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत वस्त्रांच्या लिलावातून ७३ लाख ४५ हजारांहून अधिक, तर कापड कोठीतील प्रसादरूप विक्रीतून ५ कोटी ७१ लाखांहून अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. भाविकांच्या श्रद्धेपोटी अर्पण होणाऱ्या या वस्त्रांमुळे संस्थानच्या उत्पन्नात मोलाची भर पडत आहे. शिर्डीत देशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसोंदिवस वाढ होत आहे. देणगीचा उपयोग भक्तांच्या सुविधेसाठी देश-विदेशातील भाविकांची श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. भाविकांकडून अर्पण होणाऱ्या शाली, वस्त्रे आणि इतर देणग्या ही त्यांच्या भक्तिभावाची प्रचिती आहे. वस्त्र अर्पण, संगणकीकृत सोडत आणि प्रसादरूप वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. भाविकांनी दिलेल्या प्रत्येक देणगीचा उपयोग साईबाबांच्या सेवेसह भक्तांना सुविधा व उपक्रमांसाठी करण्यात येत आहे. – गोरक्ष गाडिलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पारदर्शक सोडत प्रक्रिया एप्रिल २०२३ ते मार्च २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत साईबाबांच्या समाधीवर एकूण १९ हजार ७६ शाली अर्पण करण्यात आल्या. या शालींचे एकूण मूल्यांकन सुमारे ३ कोटी ५९ लाख रुपये इतके आहे. देणगी काउंटरवर प्राप्त होणाऱ्या वस्त्रांची रीतसर नोंद करून त्यांची संगणकीकृत सोडत काढली जाते. निवड झालेल्या भाविकांची नावे संस्थानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातात व त्यानंतरच ती वस्त्रे साईबाबांना आरतीवेळी परिधान करण्यात येतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *