![]()
नागपूर शहरात आज सकाळी सकाळी एक मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील गजबजलेल्या पंचशील चौकात मनपाच्या भरधाव बसने शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात व्हॅनमधील ३ ते ४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे. धडकेच्या वेगाने व्हॅनमधील विद्यार्थी सीटवरुन खाली कोसळले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित स्कूल व्हॅन ही पत्रकार भवनाकडून कॅनल रोडच्या दिशेने जात होती. याच दरम्यान पंचशील चौकात समोरून येणाऱ्या भरधाव बसने व्हॅनला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की स्कूल व्हॅनचे मोठे नुकसान झाले असून, धडकेच्या वेगाने व्हॅनमधील विद्यार्थी सीटवरुन थेट खाली कोसळले. या अपघातानंतर चौकात काही काळ एकच खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी सुरक्षित; प्राथमिक उपचारानंतर घरी रवाना अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना व्हॅनबाहेर काढले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने, सर्व विद्यार्थ्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे, ज्यामुळे पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिसांकडून तपास सुरू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही वाहने मर्यादेपेक्षा जास्त वेगात होती का? आणि हा अपघात नेमका सिग्नल जंपिंगमुळे किंवा कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. हेही वाचा.. नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना:साचलेल्या पाण्यात पसरला हायव्होल्टेज करंट, दोन कॉलेज तरुणी गंभीर जखमी नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या. सविस्तर वाचा मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, 4 अधिकाऱ्यांचे निलंबन मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला ‘रेड’ तर मुंबईला ‘ऑरेंज’ अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सविस्तर वाचा
Source link
नागपुरात सकाळीच अपघाताचा थरार:भरधाव बस आणि स्कूल व्हॅनची भीषण धडक; 4 विद्यार्थी जखमी