![]()
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुसळधार पावसाचा आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मोठा फटका बसला. लक्षवेधी सूचनेच्या वेळी उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला होता, ज्यामुळे कामकाज काही काळ तहकूब करण्यात आले होते. मात्र, आता विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून पुढील विषयांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान, कालच्या सत्रात मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात जोरदार राडा झाला असला, तरी राज्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारे ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ एकमताने मंजूर करण्यात आले. काल ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ विधानसभेत मंजूर कालचा दिवस महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. कृषी क्षेत्रात अहोरात्र राबणाऱ्या महिलांना हक्क मिळवून देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ काल विधानसभेत आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. शेतमजूर महिलांना शेतकरी म्हणून ओळख देणे आमचा उद्देश – कृषीमंत्री भरणे या विधेयकाबद्दल माहिती देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “या विधेयकात शेती संकल्पनेची व्याख्या अतिशय व्यापक आणि सर्वसमावेशक करण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणाच्या नावावर सातबारा करणे हा नाही. ग्रामीण भागात अनेक महिलांच्या नावावर सातबारा नसतो, तरीही त्या पीक उत्पादनासोबत पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मासेपालन आणि शेतमजुरी अशा उपजीविकेच्या साधनांवर काम करतात. अशा सर्व कष्टकरी महिलांना ‘महिला शेतकरी’ म्हणून कायदेशीर प्रमाणपत्र देणे आणि त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणे हाच सरकारचा खरा उद्देश आहे.” शेतीसाठी गौणखनिजही आता ‘रॉयल्टीमुक्त’ कालच्या सत्रात शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय झाला. शेतीच्या कामासाठी आणि शेतरस्ते दुरुस्तीसाठी लागणारे गौणखनिज (मुरूम, वाळू, दगड) आता पूर्णपणे ‘रॉयल्टीमुक्त’ उपलब्ध करून देण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल, ज्यानंतर १५ दिवसांची परवानगी दिली जाईल. तसेच या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स पाहण्यासाठी खालील लाइव्ह ब्लॉगमधून जा..
Source link
पावसाळी अधिवेशन:विधानसभेत गदारोळ; मंत्र्यांच्या गैरहजेरीवर विरोधक आक्रमक; कामकाज पुन्हा सुरू