Headlines

तीन वर्षांपासून शेतकऱ्याची अडकलेली मुदत ठेव परत:मनसेच्या आंदोलनानंतर 1 लाख 13 हजार रुपये मिळाले‎




बुट्टेवाडगाव येथील शेतकरी गोरखनाथ रामचंद्र राऊत यांची गेल्या तीन वर्षांपासून अडकलेली १ लाख १३ हजार २०० रुपयांची मुदत ठेव रक्कम अखेर त्यांना परत मिळाली आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पाटील जाधव यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आंदोलनानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, लासूर स्टेशन शाखेने ही कार्यवाही केली. शेतकरी राऊत यांनी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांच्या बचत खात्यातून १ लाख १३ हजार २०० रुपयांची एफडी केली होती. मात्र, ही रक्कम मुदत ठेव खात्यात जमा न होता परस्पर क्रॉप लोन खात्यात वर्ग झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अण्णासाहेब पाटील जाधव यांनी शेतकरी राऊत यांच्या वतीने बँक प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला, तसेच बँकेसमोर तीन वेळा आंदोलनेही छेडली. या पाठपुराव्याला यश येऊन बँक प्रशासनाने १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण १ लाख १३ हजार २०० रुपयांची रक्कम राऊत यांच्या खात्यावर जमा करून त्यांना परत केली. याबाबतची लेखी पोहोचही देण्यात आली आहे. हक्काची रक्कम परत मिळाल्याने शेतकरी गोरखनाथ राऊत यांनी बँक प्रशासन व अण्णासाहेब पाटील जाधव यांचे आभार मानले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *