![]()
एन-१ सिडको येथील काळा गणपती मंदिर परिसरात चतुर्थीनिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे लंपास केल्याची घटना उघडकीस आली. सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत दीड तासाच्या अंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ७७ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. एन-६ संभाजी कॉलनीतील रहिवासी गीता बनसोड या दर्शनानंतर मंदिराबाहेरील कटलरीच्या दुकानात गेल्या असता, गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातील पाच सोन्याचे मणी व वाट्या असलेला भाग असा सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला. त्यानंतर लगेचच साडेपाच ते सहाच्या दरम्यान सोनाली बोंगाणे यांचे ५२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्रही चोरट्यांनी पळवले. या दोन्ही घटनांप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Source link
क्राइम:गणपती मंदिर परिसरात मंगळसूत्रे केली लंपास