![]()
एकीकडे शहरात गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असताना मध्यरात्री एका अल्पवयीन मुलीवर ओढावलेले संकट टळले. ठाणे परिसरातील या मुलीने घरच्यांच्या विवाहाच्या दबावाला कंटाळून घर सोडले होते. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर उपाशी व बेवारस अवस्थेत बसलेल्या या मुलीला एका व्यक्तीने जेवणाचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेऊन गैरवर्तनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळेवर पोहोचलेल्या ‘मुक्ती वाहिनी’मुळे ती बचावली. मुक्ती वाहिनीच्या रात्रीच्या गस्ती पथकाला रेल्वे स्थानकावरून या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्वरित धाव घेतली. प्रचंड घाबरलेल्या त्या मुलीला विश्वासात घेत रात्री उशिरापर्यंत तिची आगतिकता समजून घेतली. तिला जेवण भरवून सुरक्षित निवारा देण्यात आला. त्यानंतर बालकल्याण समितीसमोर तिच्या पालकांना बोलावून, बालविवाह न करण्याबाबत लेखी समज दिल्यानंतर मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. नागरिकांची सतर्कता, पोलिसांची मदत आणि स्नेहालयच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. अल्पवयीन बालकांच्या रक्षणासाठी अहोरात्र दक्ष संकटाला घड्याळाची वेळ माहीत नसते, हे लक्षात घेत संकटग्रस्त, बेवारस आणि अल्पवयीन बालकांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेली स्नेहालयची ‘मुक्तीवाहिनी’ ही विशेष यंत्रणा आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालून नागरिकांच्या मदतीने व पोलिसांच्या समन्वयाने ही संघटना गरजू मुलांना तातडीने निवारा, सुरक्षा आणि कायदेशीर मदत मिळवून देते.
Source link
अहिल्यानगर:मध्यरात्री अल्पवयीन मुलीचा पाठलाग मुक्ती वाहिनीच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ