![]()
वसमत तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या असून नापिकी अन कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्यांनी जीवन संपविले. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुंदा येथील तरुण शेतकरी गितेश सोम्मर (२६) यांना कुरुंदा शिवारात पाच एकर शेत आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन व इतर पिके घेतली आहेत. तर या शेतावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पावसाने खंड दिल्याने पिके वाळून जात असल्याने पिक हाती येणार नाही त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती. त्यानंतर शेतात दुध घेऊन येतो असे म्हणून घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांनी शेतातील आखाड्यावर विषारी औषध पिऊन पडल्याचे दिसले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृत गितेश यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी असा परिवार आहे. या प्रकरणी संगमनाथ सोम्मार यांच्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार भगवान वडकिले पुढील तपास करीत आहेत. शेतकरी आत्महत्येच्या अन्य एका घटनेत वसमत तालुक्यातील महमदपुरवाडी येथील संतोष जटाळे (४३) यांनी नापिकी व बँकेचे असलेले १.३० लाख रुपये कर्ज कसे फेडावे या चिंतेत त्यांनी ता. ८ सप्टेंबर रोजी शेतात विषारी औषध पिले. त्यांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतांना ता. ३० सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. मयत संतोष यांना तीन एक शेत असून घरी आई, वडिल, पत्नी, तीन मुली असे कुटुंब आहे. या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीच्या उत्पन्नावर होता. मात्र पिक वाळून जात असल्याने उत्पादन हाती येणार नाही यामुळे ते अस्वस्थ होते. त्यातून त्यांनी विषारी औषध पिले. या प्रकरणी संदेश जटाळे यांच्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. जमादार भगीरथ सवंडकर पुढील तपास करीत आहेत. हेही वाचा.. कर्जामुळे विष प्राशन केलेल्या 2 शेतकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू:नापिकी, कर्जबाजारीपणामुळे उचलले होते टोकाचे पाऊल यंदा पावसाअभावी खरीपातील पिके हातचीगेली असून, निसर्गाची वक्रदृष्टी आणिडोक्यावर वाढणाराकर्जाचा डोंगर यामुळेफुलंब्री तालुक्यातीलगिरसावळी आणिसिल्लोड तालुक्यातीलपानवडोद येथील दोनशेतकऱ्यांनी विषारीऔषध प्राशन केले होते.या दोघांवरही छत्रपतीसंभाजीनगर येथील घाटीरुग्णालयात उपचार सुरू होते. सविस्तर वाचा
Source link
नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून 2 शेतकऱ्यांची आत्महत्या:हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना, कुरुंदा पोलिसांत नोंद