Headlines

हिंगोलीत सकाळच्या सत्रात 2 भूकंपाचे धक्के:4.5 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन




हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 46 मिनिटांनी हलका धक्का बसल्यानंतर पावणेदहा वाजता पुन्हा मोठा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपानंतर प्रशासनाकडून पाहणी हिंगोली जिल्हयात मागील सात ते आठ वर्षापासून जमीनीतून आवाज व भूकंपाची मालिका सुरुच आहे. विशेषतः वसमत तालु्क्यातील पांगरा शिंदे, कळमनुरी तालु्क्यातील रामेश्‍वर तांडा या शिवारात भूकंपाचा केंद्र बिंदू आहे. या शिवाय औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातही एकावेळी भूकंपाची नोंद होती. वारंवार होणाऱ्या भूकंपानंतर प्रशासनाकडून पाहणी केली जात आहे तर त्यानंतर या परिसरात भूकंपरोधक घरे व शासकिय इमारती भूकंपरोधक करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पांगरा शिंदे भूकंपाचे केंद्र बिंदू दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या भूकंपानंतर शनिवारी ता. 3 सकाळी सात वाजून 43 मिनीटांनी गढाळा (ता. औंढानागनाथ) केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी ३.३ रिश्‍टरस्केलचा भूकंप झाला. याभूकंपाचे धक्के पसिरात जाणवले आहेत. मात्र त्यानंतर 9 वाजून 44 मिनीटांनी भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून जमीनीतून मोठा आवाज व हादरा बसला आहे. पांगरा शिंदे (ता. वसमत) या भूकंपाचे केंद्र बिंदू असून 4.5 रिश्‍टर स्केल एवढी भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे धक्के हिंगोली जिल्हयातील सर्वच गावांमधून कमी अधिक प्रमाणात जाणवले आहेत. पांगरा शिंदे, कुरुंदा, वापटी, कुपटी, शिरली, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी या भागात भूकंपाची तिव्रता अधिक प्रमाणात जाणवली असून भूकंप होत असल्याचे लक्षात येताच गावकरी घराबाहेर पडले. त्यानंतर तीन मिनीटांच्या अंतराने तीन वेळी जमीनीतून आवाज आल्याचे पिंपळदरी येथील गावकरी बापुराव घोंगडे यांनी सांगितले. मात्र या आवाजाची नोंद झाली नाही. भूकंपामुळे कुठेही जीवीत हाणी नाही दरम्यान, या भूकंपामुळे कुठेही जीवीत वा वित्त हाणी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्यानंतरही या भागात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तर नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवरविश्‍वास ठेऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हेही वाचा.. पडद्यामागे हालचाली सुरू, मोदी-शहांचे संघालाही ओझे: आगामी काळात देशात राजकीय भूकंप होणार- संजय राऊत १७ सप्टेंबरनंतर देशातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून, नरेंद्र मोदी हे जास्त काळ पंतप्रधानपदावर राहणार नाहीत. तसेच, आगामी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान देशात मोठी राजकीय उलथापालथ आणि भूकंप पाहायला मिळेल,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी देशाच्या राजकारणासह आगामी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाबाबत सविस्तर माहिती दिली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *