Headlines

Shashikant Shinde Demands Immediate Relief for Raigad Farmers


“राज्यात सर्वत्र भीषण कोरड्या दुष्काळाची चर्चा सुरू असताना कोकणातील शेतकरी मात्र एकाच हंगामात अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी कात्रीत सापडला आहे. आधी पावसाने ओढ दिल्याने पिके जळाली, त्यानंतर दुबार पेरणी केली तर मुसळधार अतिवृष्टीने शेती वाहून गे

.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पक्षाचे राज्याचे सरचिटणीस रवींद्र पवार, निरीक्षक रूपेश कांडके, जिल्हाध्यक्ष चव्हाण यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोकणातील केवळ एकाच तालुक्याला मदत का?; सरकारी निकषांवर प्रश्नचिन्ह

रायगड जिल्ह्यातील भीषण कृषी परिस्थिती मांडताना शशिकांत शिंदे म्हणाले, “राज्यभरात दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत; परंतु कोकणात मात्र फक्त श्रीवर्धन या एकाच तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले. उर्वरित संपूर्ण रायगड आणि कोकणावर हा घोर अन्याय आहे.”

“शासनाच्या प्रचलित नियमावलीनुसार पाऊस कमी पडला तरच कोरडा दुष्काळ जाहीर होतो. त्या जुनाट निकषांमध्ये कोकणातील तालुके बसत नाहीत. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे आणि अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकऱ्यांची दोन्ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कोरड्या दुष्काळापेक्षा जराही कमी नाही. त्यामुळे नियम बाजूला ठेवून संपूर्ण कोकणात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे.”

पहिल्या पेरणीनंतर पावसाची दडी, दुबार पेरणी अतिवृष्टीने वाहून गेली

शेतकऱ्यांशी झालेल्या थेट संवादाचा दाखला देत शिंदे यांनी सांगितले, “मी स्वतः सकाळी जाधव वस्ती आणि होळ परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा केली. शेतकऱ्यांनी सुरुवातीला पहिल्या पावसानंतर पेरण्या केल्या, पण पावसाने महिनाभर दडी मारल्यामुळे कोवळी पिके जळून खाक झाली.”

महाड नदीकाठची शेती उद्ध्वस्त

“शेतकऱ्यांनी पदरमोड करून, कर्ज काढून पुन्हा दुबार पेरणी केली. मात्र, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड नदीला पूर आला आणि नदीकाठची संपूर्ण शेती, मातीसह पीक पूर्णपणे वाहून गेले. एकाच हंगामात दोनदा पिके गमावलेला कोकणी शेतकरी आज अक्षरशः रस्त्यावर आला आहे.”

अतिवृष्टीनंतर आता कारखान्यांच्या केमिकल पाण्याचा सुलतानी मार!

केवळ अस्मानी संकटच नाही, तर मानवनिर्मित प्रदूषणामुळेही कोकणातील शेती उद्ध्वस्त होत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस आणला. “महाड नदीपात्रात औद्योगिक वसाहतींमधील घातक रासायनिक (केमिकल) पाणी बेकायदेशीरपणे सोडले जात आहे. पुराचे पाणी आणि हे केमिकल पाणी शेतांमध्ये साचल्यामुळे उरलेली पिके पूर्णपणे कोमजून गेली असून सुकायला लागली आहेत.”

जमिनी नापीक होण्याचा धोका

“या रासायनिक प्रदुषणामुळे शेतीतील पिकांना नवे कोंबच फुटत नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान केल्या आहेत. यामुळे केवळ चालू पिकाचेच नुकसान झाले नाही, तर जमिनीचा कस कायमचा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.”

जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार; आंदोलनाचा इशारा

शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, “या संपूर्ण गंभीर परिस्थितीबाबत मी स्वतः जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांत) आणि तहसीलदारांशी थेट चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यास सांगणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ विशेष पॅकेज जाहीर करून नुकसानभरपाई दिली पाहिजे. जर सरकारने कोकणातील ओल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संपूर्ण कोकणात रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल.”

———————————–

हेही वाचा…

तुकडे-तुकडे गँग’च्या खांद्यावर हात ठेवून ठाकरेंचे मोर्चे:आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळू शकतात; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप

“केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या नावाखाली शिवाजी पार्कवर काढण्यात आलेले आंदोलन हे प्रत्यक्षात देशविरोधी शक्तींना बळ देणारे होते. ज्या उमर खलिदला देशाचे तुकडे करायचे आहेत, त्याच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर्स या आंदोलनात फडकवले गेले. आता दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) याच ‘तुकडे-तुकडे गँग’च्या दावणीला बांधले गेले आहेत का?” असा घणाघाती सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.