Headlines

Nana Patole Slams MPSC Chairman Appointment; Demands Resignations


“महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (MPSC) घटनात्मक स्वायत्त संस्थेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. विद्यमान एमपीएससी अध्यक्षांची पार्श्वभूमी पाहता ते राज्याचे मुख्यमंत्री दे

.

भंडारा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एमपीएससीतील घोळावरून राज्य सरकारवर आणि मतदार यादीतील फेरफार प्रकरणावरून केंद्र सरकारसह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.

ताकाची तहान ताकावरच; सचिवाला हटवून सरकारने चूक मान्य केली!

एमपीएससीमधील अनागोंदीवर बोलताना नाना पटोले म्हणाले, “एमपीएससी हा एक घटनात्मक बोर्ड आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा प्रचंड दबाव वाढल्यानंतर केवळ सचिवांची बदली करण्यात आली. हा प्रकार म्हणजे ‘ताकाची तहान ताकावर भागवण्यासारखा’ आहे. सचिवांना पदावरून हटवले याचा थेट अर्थ असा की एमपीएससीच्या संपूर्ण प्रक्रियेत मोठी गडबड झाली आहे, हे सरकारने स्वतःच मान्य केले आहे.”

“परीक्षेत गैरप्रकार करून सरकारने राज्यातील सुशिक्षित तरुणांचा विश्वासघात केला असून त्यांच्या भविष्याशी खेळ चालवला आहे. राज्य सरकारने या गोंधळाबद्दल जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि भविष्यात असा घोळ होणार नाही याची लेखी हमी दिली पाहिजे.”

विशिष्ट जाती-धर्माची नावे वगळली; ‘फॉर्म 6’ मधील बदलांवर अधिकाऱ्यांचेच आक्षेप

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर तोफ डागताना त्यांनी गंभीर आरोप केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत असून देशभरात ‘एसआयआर’च्या (SIR) नावाखाली लाखो पात्र मतदारांची नावे यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली. यामध्ये विशिष्ट जाती आणि अल्पसंख्याक समाजातील मतदारांना लक्ष्य करण्यात आले आहे.”

फॉर्म 6 मधील नियमबाह्य बदल

“नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’ मध्ये ज्ञानेश कुमार यांनी नियमबाह्य बदल केले. या मनमानी कारभारावर खुद्द ज्ञानेश कुमार यांचे सहकारी सिंधू आणि जोशी यांनीच तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनीही यावर हरकत घेतली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाचे पितळ आता उघडे पडले आहे.”

लोकांची मते चोरून निवडणुका जिंकल्या; ज्ञानेश कुमारांसह मोदी-शाहांनी राजीनामा द्यावा

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता पूर्णपणे संपुष्टात आल्याचा दावा करत नाना पटोले पुढे म्हणाले, “लोकांची मते चोरूनच या निवडणुका जिंकल्या जात असल्याचे आता सिद्ध झाले आहे. देशभरात १३ कोटी मतदारांची नावे संशयास्पदरीत्या वगळल्यानंतर आता पुन्हा सुधारणा करण्याचे नाटक केले जात आहे. यावरून स्पष्ट होते की मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम पद्धतशीरपणे आखले गेले होते.”

“लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या कृत्यामुळे केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनीच नव्हे, तर या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही तातडीने आपापल्या पदांचे राजीनामे दिले पाहिजेत,” अशी आक्रमक मागणी नाना पटोले यांनी शेवटी केली.

—————————————

हेही वाचा…

तुकडे-तुकडे गँग’च्या खांद्यावर हात ठेवून ठाकरेंचे मोर्चे: आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळू शकतात; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप

“केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या नावाखाली शिवाजी पार्कवर काढण्यात आलेले आंदोलन हे प्रत्यक्षात देशविरोधी शक्तींना बळ देणारे होते. ज्या उमर खलिदला देशाचे तुकडे करायचे आहेत, त्याच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर्स या आंदोलनात फडकवले गेले. आता दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) याच ‘तुकडे-तुकडे गँग’च्या दावणीला बांधले गेले आहेत का?” असा घणाघाती सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.