Headlines

Sushma Andhare Targets Thane Police Over CCTV Footage & Murder Case


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निघृण हत्येप्रकरणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत खळबळजनक आणि स्फोटक दावे करत राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे. “प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसाठी त

.

तसेच, ठाणे पोलीस आयुक्तालयातील मर्जीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे वाचून दाखवत, “302 कलमातील संशयित आरोपी उजळ माथ्याने पत्रकार परिषदा घेतात आणि ठाण्याचे पोलीस दात नसलेल्या वाघासारखे लाचार होऊन बघ्याची भूमिका घेतात,” असा घणाघात त्यांनी गृहखात्यावर चढवला.

5 कोटींची सुपारी, अडीच कोटी रोख; 15 दिवसांपासून ‘हॉटेल महाराजा’वर रेकी

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट कसा रचला गेला, याचा घटनाक्रम मांडताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “घटनेच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता पवारनगर, ठाणे येथे मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे, आरोपी पप्या शिंदे आणि संतोष कनोजिया उर्फ टल्ली यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. या हत्येसाठी 5 कोटींचा व्यवहार ठरला होता, त्यापैकी अडीच कोटी रुपये रोख स्वरूपात तिथेच दिले गेले आणि अडीच कोटी बाकी होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी ही माहिती तातडीने तपासावी.”

हॉटेल महाराजाचे सीसीटीव्ही फुटेज तपासा

“गेल्या 15 दिवसांपासून पूर्णेकर यांच्या कार्यालयाची आणि परिसराची रेकी सुरू होती. यासाठी आरोपींच्या बैठका ‘हॉटेल महाराजा’ येथे झाल्या होत्या. पोलिसांनी आता ‘हॉटेल महाराजाचे सीसीटीव्ही बंद होते किंवा फुटेज गायब झाले’ अशी कारणे देऊ नयेत. तिथले सर्व फुटेज जप्त करून तपासले पाहिजे.”

ऑडिओ क्लिपमधील किसन टट्टेचा जबाब घ्या

“ज्या ऑडिओ क्लिपला मीनाक्षी शिंदे आता ‘एआय जनरेटेड’ म्हणत आहेत, त्यावर गेल्या सात-आठ महिन्यांत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार का केली नाही? त्या क्लिपमध्ये सातत्याने ‘मीना आंटी, मीना आंटी’ म्हणणाऱ्या किसन टट्टे या व्यक्तीचा पोलिसांनी तत्काळ जबाब नोंदवावा.”

राम पूर्णेकर 25 वर्षांचा सज्ञान तरुण; भीतीने मुलींना परदेशात का पळवले?

मीनाक्षी शिंदे यांनी पूर्णेकर यांच्या मुलावर केलेल्या विधानांचा समाचार घेताना त्या म्हणाल्या, “राम पूर्णेकर हा 25 वर्षांचा सज्ञान तरुण आहे. त्याला लहान मुलगा म्हणणे आणि त्याच्या जबाबावर प्रश्न उपस्थित करणे हे शिंदे यांचे कायदेशीर अज्ञान आणि घबराट दर्शवते. पूर्णेकरांनी मीनाक्षी शिंदे यांच्या बोगस जात प्रमाणपत्र, क्लस्टर विकास आणि पार्किंग टॉवरमधील भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकारात (RTI) अर्ज केले होते, त्या वैमनस्यातूनच ही हत्या झाली.”

मुलींना परदेशात का पाठवले?

“जर तुमचा या हत्येशी काहीही संबंध नाही आणि तुम्ही निर्दोष आहात, तर मग हत्येनंतर अचानक दोन्ही मुलींना परदेशात का पळवून लावले? घरातून कागदपत्रांची आवरासावर का सुरू आहे? काल पत्रकार परिषदेत तुमची देहबोलीच सांगत होती की तुम्ही किती प्रचंड घाबरलेल्या आहात.”

ठाण्यातील पोलिसांकडून पक्षपाताचा आरोप

ठाणे पोलीस आयुक्तालय सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कसे काम करत आहे, याचा पाढा वाचताना अंधारे यांनी अधिकाऱ्यांची थेट नावे घेतली. “वागळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, कापूरबावडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे, कोणगावचे वरिष्ठ पीआय मंगेश बोरसे (ज्यांची ज्येष्ठता कमी असूनही त्यांना नियमबाह्य पदोन्नती दिली गेली) आणि सेंट्रल युनिटचे प्रफुल्ल जाधव हे कोणाच्या आशीर्वादाने ठाण्यात ठाण मांडून आहेत?”

एसीपी बढती नाकारून ठाण्यातच ठाण

“काही अधिकाऱ्यांनी एसीपी (ACP) म्हणून मिळणारे प्रमोशन नाकारले, कारण नियमानुसार त्यांना अकार्यकारी पदावर जावे लागले असते. त्यांना पुन्हा गुन्हे शाखेतच नेमणुका देण्यात आल्या. गुन्हे शाखा युनिट-1 चे अनिल शिंदे, युनिट-2 चे शीतल राऊत आणि खंडणीविरोधी पथकाचे शैलेश साळवी हे कोणाच्या राजाश्रयाने 5-6 वर्षे ठाण्यातच काम करत आहेत? ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’ अशा भूमिकेत हे अधिकारी असल्यानेच 302 मधील आरोपींवर हात लावायची यांची हिंमत होत नाही.”

बाळासाहेबांचे खरे वारसदार असता, तर रश्मी वहिनींवर बोलणाऱ्यांची जीभ हासडली असती!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “ज्या रश्मी वहिनी ठाकरे यांनी चार वर्षांपूर्वी स्वतः पुढाकार घेऊन तुम्हाला महापौरपदाच्या खुर्चीवर बसवले, त्यांच्यावर गलिच्छ भाषेत बोलताना लाज वाटली पाहिजे. गटर उघडल्यावर घाणच बाहेर पडणार, त्याप्रमाणे ही विधाने आहेत.”

एकनाथ शिंदेंना थेट आव्हान

“स्वतःला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवणारे एकनाथ शिंदे तुम्ही खरे वारसदार आहात का? जर तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार असतात, तर त्यांच्या सुनेवर अशी घाणेरडी टीका करणाऱ्यांची जीभ हासडण्याची ताकद तुम्ही दाखवली असती. मात्र, तुम्ही गप्प बसून आहात, यावरून तुम्ही नकली, स्वार्थी आणि केवळ सत्ताकेंद्री आहात हे सिद्ध होते. आमच्या पहाडासारख्या भावाच्या रक्ताचा न्याय मिळेपर्यंत आम्ही हा लढा सोडणार नाही,” असा सज्जड इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.

—————————————————-

हेही वाचा…

रश्मी वहिनींवर बोलताना लायकी लक्षात ठेवा, अन्यथा धडा शिकवू!:पूर्णेकर हत्येवरून ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे मीनाक्षी शिंदेंना थेट आव्हान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर केलेल्या आरोपांना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “गोरगरिबांसाठी लढणाऱ्या एका धडाडीच्या विभागप्रमुखाची त्यांच्याच कार्यालयात निघृण हत्या होते आणि त्याचा आक्रोश करणाऱ्या मुलावर मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याचा आरोप केला जातो, ही संतापजनक बाब आहे. मूळ एफआयआर नोंदवताना पोलिसांनी केलेल्या दिरंगाईमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच कुटुंबीयांना पोलीस ठाण्याबाहेर न्यायासाठी बसावे लागले,” असा घणाघाती आरोप शिवसेना (उबाठा) ठाणे महिला आघाडीच्या नेत्या रेखा कोपकर यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी कार्यालयात घुसून गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार: प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात 100 CCTV फुटेज स्कॅन, पप्या शिंदेकडील गाड्या जप्त; ‘टल्ली’च्या शोधात 9 विशेष पथके

ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून झालेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. राजकीय वैमनस्यातून घडलेल्या या थरारक गुन्ह्याची उकल करण्यासाठी ठाणे पोलिसांनी प्रचंड वेगाने तपासाची चक्रे फिरवली असून, तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी पप्या शिंदेसह तिघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून, आता मुख्य संशयितांपैकी एक असलेला संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’ याच्या शोधासाठी पोलिसांची ९ विशेष पथके दिवस-रात्र छापेमारी करत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.