“ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला केवळ स्थानिक वैमनस्याचा रंग देता येणार नाही. सध्या महायुतीमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता ‘ठाणे विरुद्ध नवी मुंबई’ अशा संघर्षात बदलताना दिसतोय. गणेश नाईक पूर्णेकरांच्या कुटुंबीयांचे
.
सिटिंग जागा आमचीच, कुणीही डल्ला मारू नये!
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवरून महाविकास आघाडीतील सुरू असलेल्या कुरबुरींवर वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. “पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आजगावकर आणि पदवीधरमधून अभिजीत वंजारी हे काँग्रेसचे सिटिंग आमदार आहेत. त्यामुळे ज्या जागा काँग्रेसकडे आहेत, तिथे इतर मित्रपक्षांनी विनाकारण हक्क सांगणे योग्य नाही. अमरावतीतही आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे.”

नोंदणी केलेल्या पक्षाचाच दावा ग्राह्य
“पदवीधर आणि शिक्षक निवडणुका या सर्वसाधारण निवडणुकांसारख्या नसतात. मराठवाड्यात सतीश चव्हाण आमदार असले तरी तिथे आमच्या देशमुख यांनी 60 ते 70 हजार पदवीधरांची रीतसर मतदार नोंदणी केली आहे. ज्या पक्षाने प्रत्यक्ष मतदार नोंदवले आहेत, त्यांची ताकद तिथे मानली पाहिजे. पुण्यातही युवक काँग्रेसचे शिवराज मोरे यांनी मोठी नोंदणी केली आहे. जागावाटपात समन्वय न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही खुला राहू शकतो, मात्र एकमेकांच्या सिटिंग जागांवर कुणीही अतिक्रमण करू नये.”
सचिवांप्रमाणेच एमपीएससी अध्यक्षांचीही तत्काळ हकालपट्टी करा!
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. “विद्यार्थ्यांच्या प्रचंड रोषानंतर सरकारने एमपीएससीच्या सचिवांची बदली केली. मात्र, संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणायची असेल तर केवळ सचिवांवर कारवाई करून चालणार नाही. अध्यक्षांनाही तात्काळ पदावरून हटवून संपूर्ण आयोगाचे शुद्धीकरण केले पाहिजे.”
दोन-दोन वर्षे नियुक्त्या रखडल्या
“दोन वर्षांपूर्वी निकाल लागूनही पात्र तरुणांना नियुक्त्या मिळत नाहीत. समिती स्थापन करून केवळ वेळकाढूपणा केला जात आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास तरुणांचा हा संताप सरकारला महागात पडेल.”
मतचोरांविरोधात एकत्र लढणार!
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चावर भाजप करत असलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. “ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात जो कोणी रस्त्यावर उतरेल, त्याच्या पाठीशी काँग्रेस उभी राहील. ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला प्रदेश काँग्रेसने आधीच जाहीर पाठिंबा दिला असून आमचे कार्यकर्तेही यात सहभागी होतील. मतदारांची चोरी करून सत्ता बळकावणाऱ्यांविरोधात हे आंदोलन आहे.”
भाजपला काँग्रेसचीच भीती
“भाजपवर जेव्हा जेव्हा संकट येते किंवा त्यांचे पाप उघड पडते, तेव्हा ते काँग्रेसवर खापर फोडतात. सीजेपीच्या आंदोलनात काही विचारवंतांनी भूमिका घेतली, तर लगेच काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपने सुरू केले. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी भाजप सतत काँग्रेसचा बागुलबुवा उभा करतो.”
11 ऑक्टोबरला मुंबईत देशव्यापी ओबीसी परिषद
ओबीसी आरक्षणाच्या आणि हक्कांच्या रक्षणासाठी काँग्रेसने देशव्यापी मोहीम हाती घेतल्याचे वडेट्टीवार यांनी जाहीर केले. “येत्या 11 ऑक्टोबर रोजी मुंबईतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे ओबीसींची भव्य राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. तामिळनाडूपासून काश्मीरपर्यंत देशभरातील 150 प्रमुख ओबीसी नेते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहतील.”
जातनिहाय जनगणना मुख्य अजेंडा
“देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ही काँग्रेसची ठाम भूमिका असून या परिषदेत त्यावर सविस्तर रणनीती आखली जाईल. तसेच आगामी काळात दिल्लीत होणाऱ्या देशव्यापी ओबीसी आंदोलनाची रूपरेषाही याच बैठकीत निश्चित केली जाईल,” असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
————————————————–
हेही वाचा…
हत्येच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता पवारनगरमध्ये 5 कोटींची ‘सुपारी’:अडीच कोटी रोख दिले; हॉटेलचे CCTV गायब करू नका; सुषमा अंधारेंचा मीनाक्षी शिंदेंसह ठाणे पोलिसांवर स्फोटक आरोप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निघृण हत्येप्रकरणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत खळबळजनक आणि स्फोटक दावे करत राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे. “प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसाठी तब्बल 5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हत्येच्या दिवशीच संध्याकाळी ७ वाजता पवारनगर येथे मीनाक्षी शिंदे, त्यांचे पती राजेंद्र उर्फ राजा शिंदे आणि मुख्य आरोपी पप्या शिंदे व टल्ली यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. तिथे अडीच कोटी रुपये रोख देण्यात आले होते,” असा थेट आणि गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी