![]()
महात्मा गांधी यांनी विविध संस्थानांमध्ये विभागलेल्या भारताला स्वातंत्र्याच्या लढ्यात एकत्र आणले. सत्य, अहिंसा, नैतिकता आणि निर्भयतेचा विचार त्यांनी जगाला दिला. त्यांच्या विचारांमुळे जगात भारताची वेगळी ओळख निर्माण झाली, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्या वतीने प्रभात फेरी व गांधी भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यशोधन जनसंपर्क कार्यालयापासून निघालेल्या प्रभात फेरीत गांधी वेशातील १५७ विद्यार्थी आणि कस्तुरबा गांधींच्या वेशातील १०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांसह गांधी भजनांनी शहर दुमदुमून गेले. संगमनेर बसस्थानकावर प्रभात फेरीचा समारोप झाला. यावेळी गांधी भजन व अभिवादनाचा कार्यक्रम झाला. डॉ. तांबे म्हणाले, असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह आणि ‘चले जाव’ आंदोलनातून गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरोधात जनतेला एकत्र केले. जात-पात व धर्माचे भेद बाजूला ठेवून सर्वसामान्यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतले. गांधीजींची नैतिकता आणि निर्भयता हीच त्यांची खरी शक्ती होती. प्रा. हिरालाल पगडाल यांनी आज जगाला बुद्ध आणि गांधींच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. दुर्गाताई तांबे यांनी गांधी विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. प्रा. विनोद राऊत, अविनाश कदम, गणेश गोरडे, मंगेश बिडवे व सौरभ रणधीर यांनी गांधी भजने सादर केली. तुषार भोसले यांनी गांधीजींची रांगोळी, तर सुगंध जाधव यांनी त्यांचे चित्र साकारले. ओंकार मोरे व कृष्णा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसमोर गांधीजींची मूर्ती तयार केली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, प्रा. प्रकाश पारखे, डॉ. नामदेवराव गुंजाळ, प्रा. बाबा खरात, डॉ. बाळासाहेब वाघ, एस. एम. खेमनर, ॲड. मधुकर गुंजाळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. प्रकाश पारखे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी, तर आभार डॉ. गुंजाळ यांनी मानले. ंमहात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेर शहरात प्रभात फेरी व गांधी भजनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. शहर व जिल्ह्यात गांधीजींच्या विचारांचा जागर दरम्यान, शुक्रवारी शहर व जिल्ह्यात महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. या फेरीतून विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा देखील राबवण्यात आल्या.
Source link
गांधी जयंती:गांधी वेशात अवतरले 157 ‘बापू’; संगमनेरात घुमला अहिंसेचा संदेश