Headlines

दुष्काळी झळा:जिल्हाधिकारी थेट मंगळवेढा शिवारात, शेतकऱ्यांकडून चारा अनुदानाची मागणी




जिल्ह्यातील दुष्काळाची भीषण तीव्रता आणि टंचाईची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील शेतांच्या बांधावर थेट भेट दिली. पुढील १० दिवसांच्या आत सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्ण न्याय दिला जाईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, या पाहणी दौऱ्यात दुष्काळी परिस्थिती पाहता चारा छावण्या सुरू करण्याऐवजी चारा डेपो अथवा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चारा अनुदान जमा करावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली. लेंडवे चिंचाळे येथील शेतकरी दत्तात्रय फराटे यांनी याबाबतचे थेट निवेदनच जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी यांनी गणेशवाडी येथून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सुरुवात केली. गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, शिरशी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. चारा छावण्यांचे यापूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन गावोगावच्या शेतकऱ्यांनी चारा छावणी ऐवजी चारा डेपो किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी कार्तिनकेयन यांच्याकडे केली. त्यांच्यासोबत प्रांताधिकारी बि.आर. माळी, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मंजुषा मिसाळ, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता काटकर, गटविकास अधिकारी जस्मिन शेख, तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांच्यासह मंडलाधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी उपस्थित होते. अभिमान लेंडवे , हनुमंत लेंडवे, केरापा लेंडवे, गुंडा लेंडवे ( आंधळगाव) आदी शेतकऱ्यांनी संवाद साधला आहे. आंधळगाव ते लेंडवे चिंचाळे रस्त्याने जाताना रस्त्यात पाण्याचा टँकर जिल्हाधिकारी यांच्या गाडीसमोर आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवून त्या टँकरवर बोर्ड लावला आहे काय? त्या टँकरची क्षमता किती? टँकरच्या ड्रायव्हरचे नाव आणि नोंदवले गेलेले नाव टँकरचा क्रमांक. पाणी भरण्याची क्षमता याविषयी स्वतः तपासणी केली. टँकरला जीपीएस यंत्रणा आहे किंवा नाही, याची प्रत्यक्ष पाहणी केली. टंचाईग्रस्त गावांमध्ये वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टँकरच्या खेपा सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. रस्त्यात गोठा दिसताच चारा, नियोजनाची केली विचारपूस फॉरेस्टजवळ अंकुश लेंडवे या शेतकऱ्याचा ३० जर्शी गाईंचा गोठा दिसताच पाहणी केली. नांदेडहून आलेला मुरघासचा ट्रक पाहून चारा इथे उपलब्ध असता तर किती खर्च वाचला असता ? बाहेरून आणण्यासाठी किती खर्च येतो? हे जाणून घेतले. राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांनी चारा बंदी घातली. मात्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे चारा आणण्यासाठी अडचणी येत आहेत. यामध्ये काहीतरी शिथिलता आणावी, अशी मागणी शेतकरी अंकुश लेंडवे यांनी केली. शेतकऱ्यांनी आमच्या माळ भागाकडे या. पिण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आता जर आपण उपाय योजना न केल्यास बिकट अवस्था होईल. जानेवारीमध्ये अतिशय तीव्रता जाणवेल असे सांगितले. रोटावेटरने मशागत कशी होते त्याची केली पाहणी लेंडवे चिंचाळे येथे शेतकरी ऊस उत्पादन घेतलेल्या जमिनीची रोटावेटरने मशागत करीत असताना जिल्हाधिकारी यांनी पाहिले. शेतकरी काय करतोय या उत्सुकतेपोटी त्यांनी थांबून शेतक-याकडून मशागतीची नेमकी माहिती घेतली. स्वतः रोटावेटर भोवती फिरून पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोरड्या पडलेल्या विहिरी, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना पीक नुकसान, पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता याबाबत बोलत होते. उपाय योजना न केल्यास बिकट अवस्था होईल लेंडवे चिंचोळे जवळ टँकर थांबवून यंत्रणेची केली चाचपणी नांदेडहून मुरघासचा ट्रक पाहून केली विचारपूस आंधळगाववरून लेंडवे चिंचाळेकडे जात असताना वनविभागाच्या (फॉरेस्ट) क्षेत्राजवळ अंकुश वसंत लेंडवे या शेतकऱ्याचा ३० जर्शी गाईंचा गोठा जिल्हाधिकाऱ्यांना दिसला. त्यांनी तत्काळ गाडी थांबवून गोठ्याची पाहणी केली. तेथे नांदेडहून आलेला ‘मुरघास’चा ट्रक पाहून, “चारा स्थानिक पातळीवर उपलब्ध असता तर किती खर्च वाचला असता आणि बाहेरून आणण्यासाठी किती खर्च येतो?” याची सविस्तर विचारपूस शेतकऱ्याकडे केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *