Headlines

पडद्यामागे हालचाली सुरू, मोदी-शहांचे संघालाही ओझे:आगामी काळात देशात राजकीय भूकंप होणार- संजय राऊत




१७ सप्टेंबरनंतर देशातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून, नरेंद्र मोदी हे जास्त काळ पंतप्रधानपदावर राहणार नाहीत. तसेच, आगामी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान देशात मोठी राजकीय उलथापालथ आणि भूकंप पाहायला मिळेल,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी देशाच्या राजकारणासह आगामी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाबाबत सविस्तर माहिती दिली. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाच्या मार्गात बदल संजय राऊत यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या मार्गात आता बदल करण्यात आला असून, हा मोर्चा ‘मेट्रो सिनेमा’ येथून सुरू होऊन थेट ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर’ धडकणार आहे. सर्वपक्षीय पाठिंब्याचे बळ या मोर्चाला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी मोठी ताकद दिली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, डावे पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व प्रमुख पक्षांसह महाविकास आघाडीने या मोर्चाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. ‘मोदी-शाह हे संघालाही ओझे वाटू लागलेत’ पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “सध्या देशाच्या राजकारणात पडद्यामागे अनेक मोठ्या हालचाली सुरू आहेत. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्याच पक्षात आणि संघ परिवारात अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आता स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (RSS) या दोन्ही नेत्यांचे ओझे वाटू लागले आहे.” संजय राऊत यांच्या या दाव्यांमुळे आणि ठाकरे बंधूंच्या आगामी संयुक्त मोर्चामुळे राज्यातील तसेच देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेही वाचा.. शिवाजी पार्कमध्ये सीजेपीचे विनापरवानगी आंदोलन:अभिजीत दिपकेंसह चौघांवर पोलिसांत तक्रार; सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आज मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातून आलेल्या ‘जेन झी’ तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सीजेपीने या आंदोलनाचा इशारा आधीच दिला होता, मात्र पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन पार पडल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *