Headlines

तुमची पापं आणि दुष्कर्मच पराभवाचे कारण, ईव्हीएमवर रडगाणं थांबवा:बॅलेट पेपरवरील निवडणुकांवरून राम कदमांचा काँग्रेसवर घणाघात




देशातील ४ राज्यांमध्ये विधान परिषदेच्या २८ जागांसाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुका बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला कामगिरीवरुन भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राम कदम यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या पराभवाचे कारण ईव्हीएम नसून त्यांची पापं आणि दुष्कर्म आहेत, असा घणाघात राम कदम यांनी केला आहे. ‘बॅलेट पेपरवरही काँग्रेसला शून्य जागा’ राम कदम यांनी आकडेवारी मांडत काँग्रेसच्या अपयशावर बोट ठेवले. ते म्हणाले, “देशात ४ राज्यांमध्ये २८ जागांसाठी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या. यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकट्याला १३ जागा, तर आमच्या एनडीएला (NDA) १६ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या नशिबी अगदी कमी फरकाने केवळ एकच जागा आली. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असूनही तिथे त्यांना शून्य जागा मिळाली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही शून्य जागा मिळाली.” ‘आता तरी राहुल गांधी माफी मागतील का?’ काँग्रेसकडून नेहमीच ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला जातो. याच मुद्द्यावरून राम कदम यांनी राहुल गांधींना थेट सवाल केला. “प्रश्न असा निर्माण होतो की, बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही भाजपला यश मिळत असेल आणि काँग्रेसचा पराभव होत असेल, तर आता तरी राहुल गांधी माफी मागतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘१९८४ ला पराभूत झाल्यावर आम्ही रडगाणं गायलं नाही’ भाजपच्या १९८४ च्या पराभवाची आठवण करून देत कदम म्हणाले, “१९८४ मध्ये आम्ही पूर्ण देशात हरलो होतो, केवळ २ जागा निवडून आल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, उमा भारती यांसारखे दिग्गज नेते पराभूत झाले होते. मात्र, आम्ही त्या पराजयाचे खापर ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगावर फोडले नाही. आम्ही कर्मठ कार्यकर्त्यांच्या बळावर मेहनत केली, घाम गाळत लोकांमध्ये गेलो आणि पुन्हा सत्तेत आलो.” ‘काँग्रेसने आत्मचिंतन करावे’ राम कदमे म्हणाले, काँग्रेस मात्र स्वतःच्या पराजयाचे कायम एकच रडगाणं गात असते – ईव्हीएम आणि निवडणूक आयोग. ज्या दिवशी तुम्ही आत्मचिंतन कराल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पराजयाची खरी कारणे कळतील. ईव्हीएम नाही, तर तुमचे दुष्कर्म आणि पापं हेच तुमच्या पराजयाचे मुख्य कारण आहे. ———— हेही वाचा.. हा सरकारचा पराभव, आता राज्याचे नेतृत्व पुन्हा एकनाथ शिंदेंकडे द्या: विधान परिषद निकालानंतर रवींद्र धंगेकरांची मोठी मागणी
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपने “शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही, अन्यथा पाचही जागा जिंकलो असतो” असा आरोप केल्यानंतर, आता शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पलटवार केला आहे. तसेच, या निकालानंतर समन्वय साधण्यासाठी राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *