![]()
त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक करून एजंटांच्या माध्यमातून व्हीआयपी दर्शन रॅकेट चालवणारे संशयित व देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्या अटकेनंतर त्यांच्या बँक खात्यात तब्बल १ कोटी १३ लाखांची रोकड सापडली आहे. या प्रकरणात गेल्या २० दिवसांपासून कडलग कारागृहात असल्याने त्यांचे विश्वस्तपद रद्द करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यांची विश्वस्तपदी नियुक्ती धर्मादाय उपआयुक्तांकडून झाली असल्याने हे पद रद्द करण्याचे अधिकारही त्यांनाच असून त्यांच्या कार्यालयाकडून ही प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.भाविकांकडून थेट दर्शनासाठी २ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने स्टिंग केले होते. कडलगच्या खात्यातील १.१३ कोटींबाबत पोलिसांना संशय बँक खात्यातील १ कोटी १३ लाखांच्या रकमेबाबत एसआयटीने चौकशी केली. त्यावर कडलगने स्वतःचा बचावासाठी रकमेचे वर्गीकरण केल्याचे तपासात समोर आले. हॉटेल व्यवसाय : २५ लाख रुपये, लेबर कॉन्ट्रॅक्ट (पिंपळगाव बसवंत): २४ लाख रुपये, जमीन खरेदी-विक्री कमिशन : ३० लाख, उर्वरित रक्कम: वडिलोपार्जित शेतजमीन व इतर दावा त्याने केला. मात्र, पोलिसांचा विश्वास नाही. ५० लाख रुपये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली उकळले आहेत.
Source link
त्र्यंबकेश्वर दर्शन रॅकेटचा म्होरक्या कडलगचे विश्वस्त पद रद्द होणार:खात्यात 50 लाख रु. भाविकांचे असल्याचा संशय