![]()
दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलकांवरील लाठीचार्ज व पॅलेट गन हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी दिल्ली पोलिसांच्या ‘ॲडव्हान्स तपासा’बाबतही दावा केला आहे. दगडावरील ठसे आधारशी लिंक होणार राहुल गांधी आणि अभिजीत दीपके यांनी अमित शहांवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “लोकशाहीची सुंदरता अशी आहे की कोणीही आरोप करू शकतं. आरोप केले म्हणजे ते सर्व खरं असतं असं नाही. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाचा एक फार मोठा आणि सविस्तर रिपोर्ट तयार केला आहे, तो पाहिला तर चक्कर येईल.” पोलिसांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबाबत बोलताना त्यांनी एक दावा केला. ते म्हणाले, “पोलिसांनी जंतरमंतर परिसरात पडलेला प्रत्येक दगड गोळा केला आहे. त्या दगडांवर असणारे ठसे आता आधार कार्डशी लिंक केले जातील.” “पोलिसांनी पकडलेले लोक कोणकोणत्या गुन्ह्यांत होते, त्यामध्ये परदेशी नागरिक किती होते, याचे संपूर्ण विश्लेषण पोलिसांनी केले आहे. त्यामुळे एका बाजूला राहुल गांधी आरोप करत असले, तरी पोलिसांच्या या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आकडेवारीपुढे राहुल गांधींनाही आपले आरोप सिद्ध करावे लागतील,” असे पाटील म्हणाले. दीपकेंना धमकी देणारा काँग्रेसचा कार्यकर्ताही असू शकतो अभिजीत दीपके यांनी आपल्याला भाजपकडून धमक्या आल्याचा आणि परदेशी फंडिंगच्या आरोपांवर अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर चंद्रकांत पाटलांनी दीपकेंना सल्ला दिला, “अभिजीत दीपके यांना धमक्या येत असतील, तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार करावी किंवा न्यायालयात जावे. पण धमकी देणारा भाजपचाच आहे हे कशावरून? एखादा काँग्रेसचा कार्यकर्ताही भाजपचा कार्यकर्ता म्हणून फोनवरून धमकी देत असेल. आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांनी आता आपले आरोप सिद्ध करण्याची व्यवस्था उभी केली पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी आणि वीजबिल माफी राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि वीजबिल माफीवरून विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. “शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे मुद्दल आणि व्याज असे एकही रुपया शिल्लक न राहता संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे. पुनर्गठन केलेल्या (नूतनीकरण केलेल्या) कर्जालाही यापूर्वी माफी नव्हती, ती अट आम्ही काढून टाकली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल.” मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 48 हजार कोटींच्या वीजबिल माफीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर पाटील म्हणाले, “हवेत गोळ्या मारण्याऐवजी विरोधकांनी आकडेवारीसह पुरावे द्यावेत. कुठले टेंडर किती टक्के जास्त दराने गेले आणि कोणाला दिले, हे त्यांनी पुराव्यासह मांडावे.” CET आणि पदवी घोटाळा संभ्रम संपला एमएचटी-सीईटी परीक्षा आणि पुणे विद्यापीठातील कथित बोगस पदवी प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, “सीईटी सेल, विद्यापीठे आणि परीक्षा प्राधिकरणे या स्वायत्त संस्था आहेत. सीईटी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन आणि मुलाखती देऊन या निकालातील संभ्रम पूर्णपणे दूर केला आहे. सिस्टीममध्ये कोणताही घोटाळा नाही. व्हायरल होणाऱ्या ऑडिओ-व्हिडिओची सायबर आणि गरज पडल्यास सीआयडी (CID) चौकशी होईल.” मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “लोकशाही मार्गाने, हिंसा न करता आणि एकेरी भाषा न वापरता आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. जरांगे पाटील लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकतात. यापूर्वीही मुंबईतील त्यांच्या आंदोलनादरम्यान सरकारने योग्य समन्वय साधून प्रश्न हाताळले होते.” हेही वाचा… 2 शिफ्टमध्ये काम अन् सुट्ट्याही रद्द!:तुकाराम मुंढेंविरोधात 29 कर्मचाऱ्यांनी थोपटले दंड; अपुऱ्या मनुष्यबळाचा दावा, थेट मंत्र्यांकडे केली तक्रार
अन्न भेसळविरोधी धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विभागातील अंतर्गत वादामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्टची कार्यपद्धती आणि सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
दिल्लीतील दगडांवरील ठसे आधारशी लिंक होतील!:चंद्रकांत पाटलांचा पोलिसांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या तपासाबाबत दावा; अभिजीत दीपकेंनाही दिला सल्ला