निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत राज्यातील २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांचा १८ ऑगस्ट रोजी जारी एसआयआरचा डेटा असे सांगत आहे की, वगळल्या जाणाऱ्यांचा मुद्दा किमान १२
.
२०२४ मध्ये २२ मुस्लिम मबहुल मतदारसंघांत महायुती १३ जागी विजयी
एसआयआरमुळे २२ प्रमुख मुस्लिमबहुल मतदारसंघांचे चित्र बदलणार असे दिसत आहे. २०२४ मध्ये या २२ पैकी १३ जागांवर महायुती, तर ६ जागांवर मविआने विजय मिळवला होता. तेथे विजयाचे अंतर खूपच कमी होते. याविषयी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी, काँग्रेसचे संदेश कोंडविलकर म्हणाले की, घरोघरी जाऊन पडताळणीचे काम झालेलेच नाही. दुसरीकडे भाजपने आपल्या समर्थकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
नाव वगळण्याची प्रमुख कारणे
कायमस्वरूपी स्थलांतरित ७६.८० लाख पत्ता न सापडलेले (बेपत्ता) ७५.५२ लाख मृत मतदार ३४.८१ लाख दुबार नोंदणी १७.६३ लाख
दिग्गजांच्या मतदारसंघांत वगळणीचा आकडा
देवेंद्र फडणवीस (नागपूर द. प.) १,५४,०१० एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखाडी) १,११,०८३ डॉ. जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा) २,१३,६२७ आदित्य ठाकरे (वरळी) १,०५,६१३ अबू असीम आझमी (मानखुर्द) १,४६,९६५
