![]()
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात काँग्रेस-एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी व धक्काबुक्की झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊदरम्यान एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. पुणे पोलिसांनी कार्यक्रमाला ३० अटींसह परवानगी दिली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सीओईपीमधील काही विद्यार्थिनींनी माध्यमांशी बोलताना कार्यक्रमासह शैक्षणिक शुल्क आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न मांडले होते. एनएसयूआयने कार्यक्रमासाठी मुलींना धमकावले – अभाविप दुसरीकडे, काँग्रेस आणि एनएसयूआयचे शंभर ते दीडशे कार्यकर्ते वसतिगृह परिसरात घुसले आणि विद्यार्थिनींना कार्यक्रमाला येण्यासाठी धमकावले, असा आरोप अभाविपचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी केला. काही विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचाही दावा अभाविपने केला आहे. घटनेबाबत दोन्ही संघटनांनी परस्परविरोधी आरोप केले आहेत. विद्यार्थिनींना डांबून ठेवणे, जबरदस्ती किंवा मारहाण झाल्याच्या दाव्यांना पोलिस अथवा सीओईपी प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. अभाविपने विद्यार्थिनींना डांबून ठेवले – काँग्रेसचा आरोप त्यानंतर संबंधित विद्यार्थिनींवर माफीनाम्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी दबाव आणण्यात आला. विद्यार्थिनींनी त्यास विरोध केल्यानंतर अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांना वसतिगृहात डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला. याची माहिती मिळताच काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते वसतिगृह परिसरात पोहोचल्याने तणाव निर्माण झाला. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, “राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला तरुणाईकडून मिळणारा प्रतिसाद पाहून विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा ABVPवर निशाणा COEP हॉस्टेलमधील कथित मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवल्याच्या आरोपांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ABVPवर तीव्र टीका केली. राहुल गांधींचे स्टेटस ठेवल्यामुळे विद्यार्थिनींना धमकावणे आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे चुकीचे असल्याचे सपकाळ यांनी म्हटले. विचारांचा सामना विचारांनी करण्याऐवजी मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचा आरोप करत त्यांनी, ‘विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या गुंडगिरीसमोर काँग्रेस झुकणार नाही,’ असा इशारा दिला. या प्रकरणात ABVPला सरकारचे संरक्षण आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न’; ‘छात्रों की गूंज’पूर्वी हर्षवर्धन सपकाळांचा आरोप दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून वातावरण बिघडवण्याचा आणि फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. NSUIच्या विद्यार्थिनी आणि स्वयंसेवकांवर झालेल्या कथित प्रकाराचा निषेध करत सपकाळ यांनी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच कार्यक्रमाला येणाऱ्या विद्यार्थिनी आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली. हा कार्यक्रम राजकीय प्रचारासाठी नसून विद्यार्थिनींच्या शिक्षण, सुरक्षितता, समानता, रोजगार आणि भविष्यातील संधींवर संवाद साधण्यासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ABVP च्या गुंडांनी दोन मुलींना डांबून ठेवले- विजय वडेट्टीवार दरम्यान, काल रात्री काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी दाखल होत तीव्र संताप व्यक्त केला. माध्यमांना प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, दोन मुलींना कोंडून ठेवले. ABVP च्या गुंडांनी तिला डांबून ठेवले, तिला धमकावले, मारहाण केली. त्या मुलीच्या भावाने फोन केल्यानंतर आमच्या युवा कॉंग्रेसच्या काही मुली इथे आल्या, न्याय मागायला. ज्या दोन अनाथ मुलींना ज्या पद्धतीने हुकुमशाही, दादागिरी करण्याचे काम केले. उद्याच्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे तसेच कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचे हे षड्यंत्र असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केला. तसेच जोपर्यंत त्या मुलींना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, तसेच ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला होता.
हेही वाचा.. राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमापूर्वी तणाव:’एनएसयूआय’ आणि ‘एबीव्हीपी’ कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा; युवा कॉंग्रेसचे धरणे आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम शनिवारी (दि. 22) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील ‘एसएसपीएमएस’ प्रशालेच्या मैदानावर दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली असून, कार्यक्रमस्थळी कोणतेही आक्षेपार्ह फलक, चित्र लावू नयेत तसेच धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा
Source link
पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी राडा:ABVP-NSUI भिडले; विरोधकांकडून भाडोत्री गुंडांचा वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप