![]()
आग लागल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील बाळांतीण रुग्ण आपल्या कोवळ्या बाळांसह आणि नातेवाईकांसह सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर आल्या. यावेळी महिला ओपीडी परिसरात थांबल्या, तर अनेकांनी थेट रुग्णालयाच्या बाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी थांबणे पसंत केले.
.
जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ अमरावती शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील महिला रुग्णही उपचारासाठी येतात. त्यामुळे पहाटेच्या या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल तसेच बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. सुरुवातीच्या काळात घटनेचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट नसल्याने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांमध्येही भीती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
तिला हिरावून नेले
बालिकेला धड खेळवलेही नव्हते. क्रूर नियतीने तिला हिरावून नेले, अशी दु:खद वेदना आजी बसंती जयराम काळे यांनी डोळ्याचे पाणी पुसताना व्यक्त केली. त्या बोराळा, ता. चिखलदरा येथील रहिवासी किरण गंगाराम बेठेकर यांच्या आई आहेत.
मातांना काहीच माहीत नव्हते
मातांचीही नुकतीच प्रसूती झाल्याने त्यांची इतर वॉर्डात काळजी घेतली जाते. आगीच्या घटनेनंतर या मातांना तसेच बालकांना वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे जी तिन्ही बालके मृत्युमुखी पडली त्यांच्या मातांना त्यांचे बालक दगावल्याचे दुपारपर्यंत माहीत नव्हते.
बाळासोबत भेट घालून द्या
प्रचंड ताण आल्यामुळे योगेश सावरकर यांच्या पत्नीचा रक्तदाब वाढल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आमची आमच्या बाळांसोबत भेट घालून द्या, अशी विनवणी माता, नातेवाईक प्रशासकीय अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे करताना दिसले.