Headlines

दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखाच्या मदतीसाठी जनआक्रोश मोर्चा:सिल्लोड तहसीलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा‎



पावसाने मारलेल्या दडीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सिल्लोड तहसील कार्यालयावर धडक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शासना

.

पावसाअभावी हाताशी आलेली पिके वाळली असून पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शेतकऱ्यांचा लागवड आणि खतांचा मूलभूत खर्चही वसूल होण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने नुकसानीचे तातडीने आणि पारदर्शक पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना तात्काळ पीकविम्याची भरपाई मिळवून द्यावी आणि सर्व दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशा मागण्या आंदोलकांनी प्रशासनासमोर मांडल्या. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहोचल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासनाला इशारा देताना ते म्हणाले, शासनाने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी; अन्यथा मंत्र्यांचे त्यांना रस्त्यावर फिरवू देणार नसल्याच्या या आक्रमक वक्तव्यामुळे आंदोलन परिसर चांगलाच तापला होता. शेतकऱ्यांच्या या रास्त मागण्यांबाबत शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक केले जाईल, असा सडेतोड इशारा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला.

महिला शेतकऱ्यांनीही जनआक्रोश मोर्चात नोंदवला सहभाग या जनआक्रोश मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पूरण सणांस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अजित पाटील, तालुका अध्यक्ष सुनील शिंदे, धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश पाडळे, विनोद लहाने, सरपंच मोहन गायकवाड, उपसरपंच नारायण वराडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश काकडे, दादाराव समिंद्रे, प्रसाद वराडे, कृष्णा वराडे, भाऊसाहेब शिरसाट, सागर साखळी, गजानन साखळी यांच्यासह तालुक्यातील महिला शेतकरी व परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *