![]()
कन्नड तालुक्यातील निपाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पहिली ते चौथीच्या वर्गखोल्यांच्या वऱ्हांड्याचे सीलिंग प्लास्टर अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि ३५ विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात वाचला. शाळेत वर्ग सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक शिंदे व सहशिक्षक कले पवार यांनी तात्काळ पाहणी केली असता वऱ्हांड्याचे प्लास्टर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच शालेय समिती अध्यक्ष विठ्ठल कदम, दत्तू निकम, प्रताप सूर्यवंशी आणि रवींद्र कुऱ्हाडे यांनी पाहणी केली. याच व्हरांड्यात मुले जेवणासाठी बसतात याच वऱ्हांड्यात मुले दररोज दुपारी जेवणासाठी बसतात. मात्र, शिक्षकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. दरम्यान, शालेय इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Source link
निपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्गखोलीचे प्लास्टर कोसळले, पालकांतून संताप, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली