Headlines

सिंहस्थ नाशिकचा; धावपळ शिर्डीची! 5 वाहनतळ, अतिरिक्त अन्नछत्र होणार:वाहतूक अन् पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे आव्हान



नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू असताना त्याचे पडसाद शिर्डीतही उमटणार आहेत. सिंहस्थासाठी नाशिकमध्ये येणारे लाखो भाविक साईदर्शनासाठी शिर्डी, शनिशिंगणापूर आणि परिसरातील धार्मिक स्थळांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेह

.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी नगरपालिकेला निधी उपलब्ध झाल्यानंतर विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र सिंहस्थाच्या संभाव्य गर्दीचा आवाका पाहता आजच्या गरजांपुरते नियोजन करून भागणार नाही. पुढील दशकांचा विचार करणारा एकात्मिक आराखडा आणि त्याची वेळबद्ध अंमलबजावणी आवश्यक आहे.

रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळ, हॉटेल परिसर, बाजारपेठ आणि मंदिर परिसरात गर्दीचे स्वतंत्र नियोजन करावे लागेल. भाविकांना दिशादर्शनासाठी बहुभाषिक फलक, माहिती केंद्रे आणि डिजिटल सुविधा उभारण्याची गरज आहे. दर्शन रांगा, प्रवेश-निर्गमन मार्ग, वाहनतळ आणि आपत्कालीन मार्ग यांचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. सिंहस्थाच्या काळात शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार करण्याची तसेच देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क वाढवण्याची संधी आहे. नाशिक-शिर्डी रेल्वे जोडणी आणि पुणतांबा-रोटेगाव मार्गालाही गती मिळाल्यास भाविकांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकते.

सुविधांचा उपयोग पुढील अनेक वर्षे भाविकांना होईल

सिंहस्थाची गर्दी काही महिन्यांची असेल; पण त्यानिमित्त उभारलेल्या सुविधा वर्षानुवर्षे शिर्डीच्या उपयोगी पडणार आहेत. शिर्डीमध्ये दर्शनसाठी भाविकांची वर्षभरच गर्दी कायम असते. त्यामुळे सोयीसुविधांची आवश्यकता भासते. त्यामुळे आता बैठका, पाहणी आणि आराखड्यांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामांना वेग देण्याची वेळ आली आहे. नियमित सुमारे १ लाख १८ हजार भाविकांची व्यवस्था असताना सिंहस्थ काळात आणखी १ लाख भाविकांची क्षमता निर्माण करण्याचे आव्हान आहे. अन्नछत्र, निवास, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा ताण लक्षात घेऊन आगाऊ तयारी करणे आवश्यक ठरणार आहे.

हरित ऊर्जेचे साई संस्थानचे लक्ष्य : ७.५ मेगावॅटची गरज

साई संस्थानच्या सध्याच्या गरजेच्या तुलनेत ऊर्जा व्यवस्थाही महत्त्वाची ठरणार आहे. सिंहस्थाच्या काळातील वाढीव भार लक्षात घेऊन सौर व पवन ऊर्जेची क्षमता वाढवण्याचे नियोजन आहे. १०० टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हानही संस्थानसमोर आहे. त्यासाठीही संस्थानच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याची निर्धारित वेळेत अंमलबजावणी करण्यात यश आले तर त्यामुळे संस्थानची ऊर्जेची गरज भागवून त्याबाबतीत हे भक्ती केंद्र व संस्थान स्वयंपूर्ण होऊ शकते.

साई संस्थानकडून १९० कोटी रुपयांचा आराखडा तयार

साई संस्थानने सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर १९० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यात विविध विकासकामांचा समावेश आहे. पाच वाहनतळ, दोन रोबोटिक पार्किंग, अतिरिक्त अन्नछत्र, तात्पुरती निवास व्यवस्था, परिक्रमा मार्ग आणि ऊर्जा सुविधांचाही त्यात समावेश आहे. प्रत्येक कामाची निविदा, सुरुवात आणि पूर्णत्वाची तारीख निश्चित करून वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

सिंहस्थापूर्वी शिर्डीसमोर पुढील ५ कामांची ‘डेडलाइन’!

1 गर्दीचा मास्टरप्लॅन : मंदिरापासून रेल्वे, बसस्थानक आणि वाहनतळापर्यंत संपूर्ण शहराचे एकत्रित नियोजन. 2 पार्किंगचा तिढा सोडवा : पाच वाहनतळ आणि दोन रोबोटिक पार्किंग प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याला सर्वोच्च प्राधान्य. 3 रस्त्यांवरील कोंडी रोखा : पर्यायी मार्ग, वाहतूक वळवणे आणि बाहेरील वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन. 4 भाविकांसाठी ‘वन-क्लिक’ माहिती : दर्शन, पार्किंग, निवास, वाहतूक, आरोग्य व आपत्कालीन सेवांची डिजिटल माहिती. 5 वेळापत्रक हवे. कोणते काम कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार. याचे वेळापत्रक जाहीर करण्याची गरज.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *