Headlines

लाडक्या बहिणींच्या खात्यात सोमवारपासून जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये:अखेर प्रतीक्षा संपली, सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वर्ग



‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने माहे ऑगस्ट २०२६ च्या लाभासाठी तब्बल ₹३३९.१४ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आ

.

जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर ऑगस्टचा हप्ता वेळेवर न आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यातच गणेशोत्सवात पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र ते मिळाले नाहीत. आता सामाजिक न्याय विभागाने हा निधी महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिल्याने महिलांचा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निधीचे वाटप प्राधान्याने अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थींनाच केले जावे, अशा स्पष्ट सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

२,१०० ची अजूनही वाट

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे मोठे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता स्थापनेनंतरही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने महिला वर्गात काहीशी नाराजी दिसून येत आहे.

८२ लाख महिला बाद

योजनेच्या सुरुवातीला राज्यभरातून २ कोटी ४६ लाख महिलांनी नोंदणी केली होती, परंतु पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थींना वगळण्यासाठी सरकारने ‘ई-केवायसी’ सक्तीची केली. या प्रक्रियेनंतर आणि कडक छाननीनंतर तब्बल ८२ लाख महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *