Headlines

महिन्याआधीच ऑक्टोबर हीट:संभाजीनगर@35.80; सप्टेंबरचे 25 वर्षांतील उच्चांकी तापमान, शहरात महिन्याचे 23 दिवस 30 अंशांपार




सप्टेंबर महिना संपत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘आॅक्टोबर हीट’चा अनुभव येत आहे. सप्टेंबरमधील गेल्या २५ वर्षांतील उच्चांकी तापमानाची रविवारी (२७ सप्टेंबर) शहरात नोंद करण्यात आली आहे. रविवारी कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. यापूर्वी २५ सप्टेंबर २००१ रोजी शहरात कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर प्रथमच कमाल तापमान ३५.८ अंश झाले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १० सर्वाधिक कमाल तापमानांमध्ये रविवारचे तापमान पाचव्या स्थानी आहे. यंदा शहराकडे पावसाने पाठ फिरवली आहे. बहुतांश दिवस आकाश निरभ्र आणि स्वच्छ सूर्यप्रकाश होता. त्यामुळे शहरातील तापमान सातत्याने ३० अंशांपेक्षा जास्त राहिले आहे. शहरात १३ सप्टेंबरपासून पाऊस नाही. सलग २ आठवडे कोरडे गेल्यामुळे सप्टेंबरच्या उत्तरार्धात उच्चांकी तापमान अनुभवास आले आहे. दरम्यान, हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील कमाल तापमान येत्या आठवड्यात ३५ अंशांच्या आसपास राहील. त्यामुळे उकाडाही कायम राहण्याची शक्यता आहे. यंदा सप्टेंबरमध्ये केवळ ५ दिवस पाऊस छत्रपती संभाजीनगर शहरात सप्टेंबरमधील २७ पैकी २३ दिवस तापमान ३० अंशांपेक्षा जास्त होते. गेल्या वर्षी (२०२५) केवळ १० दिवस तापमान ३० अंशांपेक्षा जास्त राहिले. सोलापूरसह ४ जिल्ह्यांत पारा रविवारी ३५ अंशांहून जास्त
सोलापूर36.6
अमरावती36.0
संभाजीनगर35.8
अकोला35.4
चंद्रपूर34.6
वर्धा34.4
परभणी34.0
जळगाव33.3
मुंबई33.2
नागपूर33.2
बुलढाणा33.0
धाराशिव32.7
अहिल्यानगर32.2
पुणे31.9
यवतमाळ31.4
नाशिक29.7
महाबळेश्वर24.9
(तापमान अंश सेल्सियसमध्ये)
एल निनोचा परिणाम; संभाजीनगरात आणखी १० दिवस पाऊस बरसणार नाही
परतीचा पाऊस राजस्थान सोडून मध्य प्रदेशापर्यंत आला आहे. हीच स्थिती पाहता महाराष्ट्रातून हा निघून जाणार आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यात पाऊस असणार नाही. संभाजीनगरातही १० दिवस पावसाची कुठलीही चिन्हे नाहीत. ‘ऑक्टोबर हीट’ सप्टेंबरमध्येच जाणवत आहे. हा एल निनोचा परिणाम असून यंदा हिवाळ्यात थंडी कमी राहील. -श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम अंतराळ संशोधन संस्था. पाण्यासाठी वन्यजीवांचीही वणवण सुरू, डिहायड्रेशनमुळे पक्ष्यांनाही भोवळ
उष्णतेचा आणि पाण्याच्या कमतरतेचा फटका वन्यजीवांना बसत आहे. डिहायड्रेशनमुळे घार, पोपट, काळा शराटी यांसारखे पक्षी भोवळ येऊन पडत आहेत. रेस्क्यू टीमने काही दिवसांत अत्यंत अशक्त अवस्थेतील अनेक पक्ष्यांना जीवदान दिले. त्याच वेळी शहरालगत इंडियन रॉक पायथन (अजगर) व कोब्राचेही रेस्क्यू करण्यात आले. नैसर्गिक अधिवासातील तापमान वाढीने व पाण्याचे स्रोत आटल्याने साप, अजगर गारव्याच्या शोधात वस्तीकडे, घरांकडे आश्रयाला येत आहेत. २५ सप्टेंबरचे किमान तापमान ५५ वर्षांत दुसरे उच्चांकी…
सप्टेंबरमध्ये यंदा संभाजीनगरमध्ये किमान तापमानात सतत चढ-उतार राहिला. रविवारी किमान तापमान २१.८ अंशांपर्यंत घसरले. त्यामुळे रात्री गारवा होता. किमान तापमानानेही यंदा उच्चांक गाठला आहे. किमान तापमान २५ सप्टेंबर रोजी २५.५ अंशांपर्यंत पोहोचले. ५५ वर्षांतील टॉप १० उच्चांकी किमान तापमानात हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *