Headlines

मतचोरी झालीच नाही,तर राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेला- देवेंद्र फडणवीस:संविधानाच्या नावाने अराजकता माजवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप




‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना जोरदार हल्लाबोल केला. ‘मतचोरी झाली नाही, तर राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेला आहे. त्यांचा चोरीला गेलेला मेंदू परत मिळवून देण्यासाठी एखादी समिती स्थापन करावी,’ असा उपरोधिक टोला फडणवीस यांनी लगावला. राहुल गांधी संविधान हातात घेऊन दररोज संवैधानिक संस्थांवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यामुळे या संस्थांवरील जनतेचा विश्वास उडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राहुल गांधी यांची मानसिकता अति डावी झाली असून देशात अराजकता निर्माण करून संविधानावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या भूमिकेचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. तिन्ही निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन आयोगातील निर्णय एकमताने होत असल्याचे तसेच एसआयआरसह निवडणूक प्रक्रियेतील सर्व बाबी नियमानुसार असल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांचा मोर्चा केवळ ‘पॉलिटिकल स्टंट’ उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाबाबत फडणवीस यांनी हा ‘पॉलिटिकल स्टंट’ असल्याची टीका केली. संविधान आणि संवैधानिक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंडिया आघाडी अस्तित्वात नसून लोकसभेनंतर विविध विधानसभा निवडणुकांत घटक पक्ष वेगवेगळे लढल्याने ती संपली. पश्चिम बंगालमध्ये १५ मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात मतदार संख्या कमी झाली, तेथेही तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येक पक्षाला मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी असून प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी पक्षांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *