Headlines

व्यसनमुक्ती, अपघात अन‌् पर्यावरणावर विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जागृती:चांदवडयेथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात रासेयाे दिन साजरा‎




व्यसनमुक्ती, रस्ता अपघात प्रतिबंध, जल व पर्यावरण संवर्धन… समाजासमोरील गंभीर प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून थेट जनजागृती केली. प्रसंगी अभिनय, संवाद आणि प्रभावी संदेशातून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत विद्यार्थ्यांनी सेवाभावाचा जागर घडवला. श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) दिनानिमित्त हा उपक्रम उत्साहात झाला. यावेळी मानवसेवा हीच खरी राष्ट्रसेवा असून, राष्ट्रसेवा हाच विकसित भारताचा मूलमंत्र आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय दहाड यांनी केले. महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटतर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. उपप्राचार्य डॉ. संगीता दोशी यांनी एकता व समतेचे महत्त्व सांगत समाजातील प्रत्येक घटकाप्रती समानतेची आणि सेवाभावाची भूमिका ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्था पदाधिकारी बेबीलाल संचेती, दिनेशकुमार लोढा, अजितकुमार सुराणा, अरविंद भंसाळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी व उद्दिष्टांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयाचे समन्वयक नंदकुमार ब्रम्हेचा, डॉ. सुनील बागरेचा, सुमती सुराणा, विवेक जैन, डॉ. आकाश जैन, सीए पंकज चोपडा आणि प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी एनएसएस गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, उद्दिष्टे आणि उपलब्धींवर भाषणे केली. त्यानंतर सादर झालेल्या पथनाट्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सामाजिक प्रश्न केवळ चर्चेचा विषय न राहता त्यासाठी जनजागृती करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे, असा संदेश या सादरीकरणातून देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान डॉ. परेवाल व डॉ. ब्राम्हणे यांनी ‘माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी’ या एनएसएसच्या सेवाभावी ब्रीदवाक्याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. विविध उपक्रमांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवयवदानाचा संकल्प एनएसएस अधिकारी डॉ. अमित जगझाप यांनी उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करण्याचा संकल्प केला.गरजू रुग्णांना नवजीवन देण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *