![]()
हर्सूल सावंगी बायपास परिसरातील शेतात ५ वर्षांचा गतिमंद बालक ओंकार याची त्याच्या सावत्र बापानेच गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या लग्नासाठी अडसर ठरत असल्याने पोटच्या मुलाला संपवण्यासाठी जन्मदात्या आईनेही या कृत्यात पतीला साथ दिली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको व गुन्हेशाखेच्या पोलिसांनी २४ तासांत आरोपी संतोष सोनाजी ढाळे (३४, रा. मोप, जि. वाशिम) आणि पत्नी पूजा (२९) यांना अटक केली आहे. आरोपी पूजाचे पहिले पती संदीप पाडेवाड (रा. बिलोली, जि. नांदेड) यांच्या निधनानंतर, ती गतिमंद मुलगा ओंकारला घेऊन जालन्याला आली होती. तेथे तिची ओळख संतोष ढाळे याच्याशी झाली आणि त्यांनी शिर्डीत लग्न केले. महिनाभरापासून ते सावित्रीनगर येथे भाड्याने राहत होते. मात्र, ओंकार हा त्यांच्या नव्या संसारात अडसर ठरत असल्याने संतोष दारू पिऊन त्याला सतत मारहाण करायचा. अखेर दोघांनी मिळून ओंकारचा काटा काढण्याचा कट रचला. मात्र त्यांना अटक केली. ही कारवाई पीआय गजानन कल्याणकर, सोमनाथ जाधव, प्रवीण वाघ यांच्या पथकाने केली. मध्यरात्री घडवला थरार सोमवारी (१८ मे) रात्री संतोषने दारूच्या नशेत झोपलेल्या ओंकारला लाथा मारून फेकून दिले आणि त्याचा गळा आवळला. यात ओंकार जागीच बेशुद्ध पडला. धक्कादायक म्हणजे, आई पूजाने त्याला वाचवण्याऐवजी स्वतःच्या ओढणीने झाकले. त्यानंतर संतोषने बालकाला घरापासून ५०० मीटर अंतरावरील सावंगी बायपासजवळील शेतात नेऊन ओढणीखाली लपवून मृतदेह फेकून दिला.
Source link
दुसऱ्या लग्नासाठी अडसर ठरणाऱ्या गतिमंद बालकाची सावत्र बापाकडूनच निर्घृण हत्या:दारूच्या नशेत चिमुकल्याला लाथा मारून गळा दाबला; डीएनएसाठी आईचे नमुने घेणार