![]()
देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळमच्या मार्गे देशात प्रवेश करू शकतो. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी (९०%) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला तरी, महाराष्ट्रासाठी मात्र एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तब्बल ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी सांगितले की, अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळम आणि तामिळनाडूच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल आहे. राज्यात पावसाचे मोठे खंड ‘कृषी हवामान फोरम साऊथ आशिया’चे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार राज्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल. पण पावसाचे मोठे खंड राहतील. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर या काळात पावसाचे प्रमाण चांगले राहील. धुळे, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि पुण्याचा पूर्व भाग येथे पावसाची ओढ राहू शकते. पावसाच्या मोठ्या खंडांमुळे जायकवाडी न भरण्याची चिंता महाराष्ट्रात ९८ टक्के पाऊस होणार असला तरी पावसाचे वितरण खूप असमान राहणार अाहे. त्यात मोठे खंड पडू शकतात. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरेल की नाही, याबाबत साशंकता कायम आहे.
Source link
देशात 90, महाराष्ट्रात 98% पाऊस; पण यंदा खंडही मोठे:नैऋत्य मान्सून येत्या 2 ते ३ दिवसांत केरळममध्ये; संभाजीनगरला वादळी पावसाचा तडाखा