![]()
आनंदी व निरामय जगण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळ अत्यंत आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या फिटनेस आणि क्रीडा संस्कृती संवर्धनासाठी बॉलर्स क्लबने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्रात चांगले खेळाडू घडतील असा विश्वास माजी क्रिकेटपटू किशोर गांधी यांनी व्यक्त केला. साईनगर, बुरूडगाव रोड परिसरात बॉलर्स क्लबने नव्याने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मैदानाचे पूजन व शुभारंभ प्रसंगी ॲड. राजेंद्र सेलोत, डॉ. हेमा सेलोत, बबिता गांधी, चेतन आगरवाल, कृष्णाली सेलोत आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण केंद्रासाठी बॉलर्स क्लबचे संचालक ॲड. हर्षल सेलोत, आंतरराष्ट्रीय कॉर्फबॉल खेळाडू दिशान गांधी आहेत. शालेय मुलामुलींना घडवण्याचा त्यांचा ध्यास आहे. या मैदानासाठी चिराग शेटिया, धनेश लोढा, परेश लोढा, धनंजय भोसले यांचे सहकार्य लाभले आहे. बॉलर्स क्लबचे प्रशिक्षक हर्षल सेलोत व दिशान गांधी हे स्वतः निष्णात बास्केटबॉल खेळाडू आहेत. खेळाप्रती आवडीच्या ध्यासातून नवनवीन गुणी खेळाडू घडवण्याचा त्यांचा मानस आहे. आयकॉन पब्लिक स्कूल व सावेडी परिसरातही त्यांचे प्रशिक्षण वर्ग चालू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Source link
दैनंदिन जीवनामध्ये मैदानी खेळांचे महत्व- किशोर गांधी:बॉलर्स क्लब बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राचे उत्साहात उद्घाटन