Headlines

दैनंदिन योग हा शांत व निरोगी मनाची गुरुकिल्ली:शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित योगसत्रात डॉ. जे. डी. पवार यांचे प्रतिपादन‎




मानवी जीवनातील योगाभ्यासाचे महत्व स्पष्ट करून दैनंदिन योग हा निरोगी तनाची व शांत मनाची गुरुकिल्ली आहे, प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास योगाभ्यास केला पाहिजेच, त्यामुळे दिवसभरातील कामांना ऊ र्जा व उत्साह मिळत असल्याचे डॉ. जे. डी. पवार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार व शाळेचे डायरेक्टर प्रिन्सिपल बी. एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर पार पडले. यावेळी ते बोलत होते. दोन तास चाललेल्या या विशेष योगसत्रात सहभागी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक व अ ध्यात्मिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थांसह शाळेचे प्राचार्य बी. एन. शिंदे, ज्यू. कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल, उपप्राचार्य डॉ. अविनाश लांडगे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार तसेच योगशिक्षक जयंत विभांडीक व स्नेहल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन यांसह विविध योगमुद्रांचा सराव केला. तसेच अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी यांचा योगाभ्यास केला. प्राचार्य बी. एन. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, योग हा भारताची हजारो वर्षांची परंपरा असून, योगाभ्यासाची ओळख भारताने जगाला करून दिली आहे. “आजच्या धावपळीच्या जीवनातील योगसाधनेचे महत्त्व’ या विषयावर त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री गुरुदत्त शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, कर्मचारीवृंद तसेच गुरुदत्त स्पोर्ट्स क्लबचे सदस्य, उद्योजक चंदू शिरोरे, मंगेश भावसार व मिशन एकशे एक प्लस ग्रुपच्या सर्व सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *