Headlines

दोन एकरातील 1800 केळीच्या झाडांचे नुकसान:पंचनामा, तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी‎




अंजनगाव बारी परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसासह गारपीटीने केळी पिकाचे अक्षरशः वाटोळे केले आहे. सर्व्हे क्र.३९९/१ मधील शेतकरी निखील श्रीकृष्ण भोपळे यांच्या शेतात तब्बल २ एकर क्षेत्रावर उभे असलेले केळी पीक नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले. शेतकरी भोपळे यांच्या शेतातील २६५० केळीच्या झाडांपैकी सुमारे १६०० ते १८०० खोडांचे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे नुकसान झाले असून, प्रति किलो १४ रु.च्या बाजार भावानुसार लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हवामानातील वाढत्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले असून शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे. चिखलदरा तालुक्यातील बिहाली ते घटांग दरम्यान शुक्रवारी ८ रोजी अचानक वातावरणात मोठा बदल झाला असून जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे परिसरात काही वेळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कांदा-संत्रा-केळी या तिन्ही पिकांना फटका केळी पिकासोबतच परिसरातील कांदा व संत्र्याच्या झाडांनाही मोठा फटका बसला असून वाऱ्याच्या तडाख्याने झाडे उन्मळून पडली आहेत. तर गारपीटीमुळे पिकांची जास्तीत जास्त हानी झाली. या तिहेरी नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे उत्पादन धुळीस मिळाले असून शासनाने त्वरीत मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *