Headlines

दोन दशके वाट पाहिली; 95 किमी चालत सरकारला विचारणार जाब:अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्यासाठी संजय काळेंचा सावळीविहीर ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय पायी प्रवास‎



अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मंगळवारी सावळीविहीर फाटा येथून अनोख्या पायी आंदोलनास सुरुवात केली. सुमारे ९० ते ९५ किलोमीटरचा प्रवास करून ते अहिल्यानगर ज

.

पहिल्या दिवशी सावळीविहीर फाटा ते राहाता असा सुमारे १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून काळे छत्रपती शिवाजी चौकात पोहोचले. यावेळी नागरिकांनी त्यांचे स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दिला. राहाता शहर मनसेच्या वतीने शहराध्यक्ष विजय मोगले यांनी त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काळे यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला.

माझा सत्कार करू नका. पाठिंबा द्यायचा असेल तर माझ्याबरोबर दोन पावले चला, हाच माझ्यासाठी खरा सत्कार आहे, असे त्यांनी सांगितले. काळे म्हणाले, सत्ताधारी बदलले, मंत्री बदलले, सरकारे बदलली; मात्र नगर-कोपरगाव रस्त्याची अवस्था बदलली नाही. रस्ता रुंदीकरणासाठी ब्रिटिशकालीन मोठमोठे वटवृक्ष तोडण्यात आले. त्यानंतर दोन दशके उलटूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. महात्मा गांधींच्या आंदोलनाच्या मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत काळे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. “नागड्या जिल्ह्याचा प्रतिनिधी नागडाच चालणार; जनतेची लाज म्हणून कंबर झाकणार,” असे त्यांनी म्हटले. या प्रवासात २६ ऑगस्टला राहाता-बाभळेश्वर, २७ ऑगस्टला बाभळेश्वर-कोल्हार, त्यानंतर राहुरी फॅक्टरी, राहुरी विद्यापीठ, देहरे, एमआयडीसीमार्गे ५ सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय असा प्रवास नियोजित आहे. यावेळी विजय मोगले, वाकचौरे, रामनाथ सदाफळ आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *