Headlines

दोन दिवसांपासून ‘ चाळीशी पार’चा फटका; 7 वर्षांत तिसऱ्यांदा उच्चांक:गत आठवड्यात पाऊस, या आठवड्यात उन्हाचा कडाका‎




गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने ‌उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या क्रमात सोमवारचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान गेल्या सात वर्षांतील उच्चांक आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर अचानक या आठवड्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते अक्षरश: निमर्नुष्य झालेले दिसून येत आहेत. येथील जलविज्ञान केंद्राच्या तपशिलानुसार सोमवारी, १३ एप्रिलचे तापमान हे २०२० पासूनच्या सात वर्षांतील सर्वाधिक तापमान आहे. २०२२ आणि २०२५ मध्ये आजच्या दिवशी (१३ एप्रिलला) ४३ अंश सेल्सिअस तापमान होते. तो अपवाद वगळता इतर कोणत्याही वर्षीच्या तापमानाने हा आकडा गाठला नाही. त्यामुळे २०२० ते २०२६ या सात वर्षांच्या कालखंडात आजच्या दिवशीचे हे सर्वाधिक तापमान अशी नोंद झाली आहे. जलविज्ञान केंद्रातील सूत्रांच्या माहितीनुसार वातावरणात अनियमित आणि मोठे वदल होत आहेत. या बदलांमुळे उष्णतेच्या लाटांसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. मार्चच्या उत्तरार्धातनंतरच्या काही दिवसांचा अपवाद वगळता अमरावतीचा पारा ४१-४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने प्रचंड उष्णतेची लाट आली आहे. या भीषण उकाड्यामुळे दुपारी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठेत शुकशुकाट उर्वरित. पान ४ वाढत्या ऊन्हापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत मोकळ्या जागांमध्ये जाणे टाळावे. श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अचानक अस्वस्थ वाटत असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य वायुविसर्जनासाठी खोल्यांचे दरवाजे उघडे ठेवावे. मोबाईल फोनचा वापर कमीत कमी करावा. दही, ताक आणि लिंबू शरबत,आंब्याचे पन्ह यांसारखी थंड पेये भरपूर प्यावीत. गॅसची उपकरणे, लायटर्स, कार्बनयुक्त पेये, सुगंध आणि बॅटरी या वस्तू दुचाकी व चारचाकी गाड्यांमध्ये ठेवू नयेत. हवा खेळती राहण्यासाठी गाडीच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्या. गाडीची पेट्रोल टँक पूर्णपणे भरू नये. इंधन शक्यतो संध्याकाळी भरावे. टायरमध्ये जास्त हवा भरू नये. गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नये. अनिल बंड, हवामान तज्ज्ञ. पारा ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आगामी आठवड्यात (१५ ते २० एप्रिल दरम्यान) विदर्भातील तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची प्रचंड लाट सक्रिय होवून तापमान ४७ अंश सेल्सीअसपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणे महत्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *