![]()
लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने भगवान श्री धन्वंतरी पूजन सोहळ्याचे शुक्रवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात डॉक्टरांनी भगवान श्री धन्वंतरी यांचे पूजन करून धार्मिक श्रद्धेसोबतच परस्पर स्नेह, सहकार्य आणि संघटनात्मक एकजुटीचा संदेश दिला.
.
भगवान श्री धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. सोनल सोनवणे व डॉ. भाग्यश्री सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. स्नेहल रोहित शेळके यांनी धन्वंतरी स्तवन सादर करून वातावरण भक्तिमय केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनोद लोहाडे होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल जैन यांच्यासह डॉ. विलास कांगणे, डॉ. कैलास पाटील, डॉ. सुरेश दरेकर, डॉ. अशोक महाले, डॉ. अनिल बोराडे, डॉ. विजय केंगे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्रीकांत आवारे व डॉ. युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी असोसिएशनच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉ. ऋता घनघाव व डॉ. प्रियंका गायकर यांनी केले, तर डॉ. मृगेश शहा यांनी आभार मानले.
या सोहळ्याला लासलगाव परिसरातील अनेक डॉक्टर्स व मान्यवर उपस्थित होते. धार्मिक श्रद्धेसोबतच डॉक्टरांमधील परस्पर स्नेह, सहकार्य, बंधुभाव आणि संघटनात्मक एकजूट अधिक दृढ करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.