Headlines

‘आमची दिवाळी वंचितांसाठी”:युवा फाउंडेशनतर्फे गरजू व वंचित कुटुंबांना फराळ, कपड्यांचे वाटप, नांदगाव तालुक्यात सलग सातव्या वर्षी उपक्रम



“चलो जलायें दीप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा है!’ या उक्तीनुसार, समाजातील वंचित आणि गरीब घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा प्रकाश पेरण्यासाठी ‘युवा फाउंडेशन सामाजिक संस्थे’च्या वतीने सलग सातव्या वर्षी ‘आमची दिवाळी वंचितांसाठी’ हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

.

दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, गोडधोड फराळ आणि नवीन कपडे असा सर्वसाधारण समज असतो. मात्र, समाजातील अनेक गरजू बंधू-भगिनींना आर्थिक परिस्थितीमुळे या आनंदाला मुकावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन, आपला सणाचा आनंद या वंचित घटकांसोबत वाटून घेण्याच्या उद्देशाने युवा फाउंडेशनने पुढाकार घेतला. या उपक्रमांतर्गत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध वस्त्या आणि भागांत जाऊन गरजू व वंचित कुटुंबांना दिवाळीचा स्वादिष्ट फराळ तसेच नवीन कपड्यांचे वाटप केले. या अनोख्या दिवाळीमुळे गरीब कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे हास्य फुलले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा फाउंडेशनचे केतन करवा, सुमित सोनवणे, सुमित गायकवाड, आनंद घोडके, प्रसाद वडनेरे, उबेद शेख, तुषार पाटील, धीरज पाटील, सिद्धेश सोनवणे, प्रथम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *