Headlines

नवनीत राणा म्हणजे जातीय विष पेरणारी 'विषवल्ली:राणा अन् बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा, महिलांच्या अत्याचारात जात-धर्म येतोच कुठे?- विजय वडेट्टीवार




माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यासोबतच डॉ.अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांनी अमरावती प्रकरणी चुकीची माहिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली आहे, असे मी मानतो. जात आणि धर्मामध्ये भांडण लावून सत्तेची पेाळी कशी शेकता येईल, अशा प्रकारे पाणी घालून पोसलेली विषवल्ली आहे, असे म्हणत त्यांनी नवनीत राणांवर एकेरी टीका केली आहे. अत्याचार प्रकरणात जात-धर्म नसतो विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिलांवर अत्याचार झाला असेल तर तिथे जात-धर्म-पंथ येतो कुठे? असे कृत्य करणारा नालायकच असतो त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अमरावती प्रकरणी कोणी बुरख्या वाल्या नव्हत्या म्हणता ते त्यांना कसे माहिती? कशाच्या आधारावर हे बोलल्या? या बाईची सवय आहे ही अतिशय जातीयवादी आणि धर्मांदली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडले आणि जिरवली तरी हे शुद्धीवर येत नाही. तुमच्याकडे पोलिस आहे सर्व यंत्रणा आहेत तुम्ही प्रकरणाची माहिती घ्या, उगाच तोंडाचा वाफा कशाला काढत आहात, तुमच्या शब्दांना आवर घाला, माहिती घेऊन बोला. राणांनी खरातबद्दल ब्र शब्द काढला नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, अमरावती प्रकरणातील मुली या कोण आहेत हे महत्त्वाचे नाही. या प्रकरणात काय जात आणि धर्म महत्त्वाचा नसतो. खरात संदर्भात ब्र शब्द न काढणारी बाई मुस्लीम तरुण दिसताच बावचळल्यासारखी बोलते हे अत्यंत घृणास्पद आहे, त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. महायुती म्हणजे ट्रिपल इंजिन मलिदा गँग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झालेत. कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यात भ्रष्टाचार करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *