![]()
नांदेड शहर दिवसेंदिवस अवैध शस्त्र विक्रीचा बाजार बनत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज टाकलेल्या धाडीत तब्बल 703 अवैध शस्त्र जप्त करण्यात आली असून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे नांदेड शहरातील अवैध शस्त्र विक्रीचा बाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ग्रामीण पोलिसांनी 7 मे 2026 रोजी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 4 हजाराहून अधिक शस्त्र जप्त करत 53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता त्यानंतर अवघ्या 15 दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या टीमने पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करत 300 सालांना शॉपिंग प्लाजा येथे रणजीत सिंग सरदार यांच्या दुकान kraman 8 मध्ये छापा टाकून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे . या कारवाईत 470 तलवारी ,209 खंजर , 24 फायटर असे एकूण 703 अवैध शस्त्र जप्त केले असून हा मुद्देमाल 14 लाख 4 हजार 300 रुपयांचा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिली आहे. ही कारवाई स्थानिक गणेश शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या टीमने केली आहे. या कारवाईत आरोपी रणजितसिंग रामसिंग सरदार रा. नंदिग्राम सोसायटी नांदेड याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 15 दिवसात दुसरी कारवाई 7 मे 2026 रोजी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी मोठा छापा टाकून 4 हजार 300 अधिक शस्त्र जप्त करत 53 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. त्यानंतर अवघ्या 15 दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच परिसरात छापा टाकून 703 शास्त्र ताब्यात घेतली आहेत. अवघ्या पंधरा दिवसात अवैध शस्त्र बाजारावर धाड टाकण्याची नांदेड पोलिसांची ही दुसरी कारवाई ठरली आहे. अवैध शास्त्र विक्रीचा बाजार उखडून काढू – पोलिस अधीक्षक नांदेड मध्ये अवैध शस्त्र विक्रीच्या धंदा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात असल्याच्या चर्चा रंगत असल्या तरी नांदेड पोलिस असा कोणताही बाजार चालू देणार नाही. विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध आणि विक्री, खरेदी करणाऱ्या विरुद्ध कायद्याने कठोर कारवाई करण्यात येईल. यात कोणाची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिला आहे. ते म्हणाले की, चोरीच्या मार्गाने पर राज्यातून शस्त्र नांदेडमध्ये आणली जातात. त्यांची विक्री केली जाते. त्यामुळे नांदेड शहरात येणाऱ्या अवैध शस्त्रावरही आता पोलिसांची नजर असेल. अशी माहिती त्यांनी दिली. 500 ते 7 हजार रुपये पर्यंत होते विक्री प्रत्येक तलवारीची किंमत वेग वेगळी आहे . तलवारीच्या मुठीवर असलेल्या नक्षीकामावरूनही तलवारीची किंमत ठरवली जाते. त्यामुळे किमान 500 रुपये ते कमाल 7000 रुपये तलवारीची किंमत असल्याची माहिती मिळाली आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचेही सांगण्यात आले. कुरियर, रेल्वेद्वारे आणली जातात शस्त्र नांदेड मध्ये येणारा शस्त्रसाठा हा हरियाणा ,पंजाब , लुधियाना या भागातून पुरवठा केला जातो . अनेक वेळा हा शस्त्रसाठा कुरियर द्वारे बॉक्समध्ये पॅकिंग करून पाठवला जातात तर पोत्यात भरून रेल्वेच्या वॉशरूम मध्ये ही शस्त्र टाकली जातातm ती नांदेडमध्ये आल्यानंतर उतरून घेतली जातात. याशिवाय अनेक ट्रक मधून , खाजगी ट्रॅव्हल्स मधूनही असा शस्त्रसाठा पुरवठा केला जातो.
Source link
नांदेडमध्ये अवैध शस्त्र साठ्यावर धाड:470 तलवारींसह 703 शस्त्र जप्त, 14 लाखांचा मुद्देमाल ताब्यात; 15 दिवसात दुसरी कारवाई