Headlines

नागपूर विभागातील 70 हजार शेतकऱ्यांना 544 कोटींची कर्जमाफी:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत थेट खात्यात रक्कम जमा




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नागपूर विभागातील ७० हजार २९० पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ५४४ कोटी ७० लाख ५४ हजार १३० रुपये ऑनलाईन पोर्टलद्वारे थेट जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ऑनलाईन प्रणालीद्वारे ही कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आली. या योजनेमुळे राज्यभरातील ६.२२ लाख पात्र खातेदारांच्या कर्ज खात्यात तब्बल ५,०२८ कोटी रुपये ऑनलाईन पोर्टलद्वारे थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पिक कर्ज वाटप करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना दिले आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच उर्वरित शेतकऱ्यांच्याही खात्यात लाभाची रक्कम तात्काळ वर्ग केली जाणार आहे. नागपूर विभागातील जिल्हानिहाय वितरणात चंद्रपूर जिल्ह्याने सर्वाधिक लाभ मिळवला आहे. विभागातील एकूण ७० हजार २९० शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे. जिल्हानिहाय वितरीत झालेली रक्कम आणि लाभार्थी शेतकरी खालीलप्रमाणे आहेत: चंद्रपूर जिल्ह्यात २६,२२९ शेतकऱ्यांना १९८ कोटी ५९ लाख ४८ हजार रुपये, वर्धा जिल्ह्यात १०,६३५ शेतकऱ्यांना १०९ कोटी ९१ लाख १६ हजार रुपये, गोंदिया जिल्ह्यात १२,६७९ शेतकऱ्यांना ७५ कोटी ७४ लाख ७३ हजार रुपये, भंडारा जिल्ह्यात ११,६९६ शेतकऱ्यांना ७५ कोटी २५ लाख ८१ हजार रुपये, नागपूर जिल्ह्यात ६,३८० शेतकऱ्यांना ७० कोटी ६१ हजार रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यात २,६७१ शेतकऱ्यांना १५ कोटी १८ लाख ७२ हजार रुपये मिळाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *